'...तर तो खरा शिवसैनिक', आदित्य ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

'...तर तो खरा शिवसैनिक', आदित्य ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

'पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला हरकत नाही. पण कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का?'

  • Share this:

पुणे, 21 जुलै : 'आदित्य ठाकरेच्या दौऱ्याचं स्वागत आहे. आदित्य सच्चा शिवसैनिक आहे का ते आता कळेल. एसीतून बाहेर पडून अंगाला माती लागेल असं काम केलं तर तो खरा शिवसैनिक ठरेल,' असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन-आशीर्वाद यात्रेबद्दल भाष्य केलं आहे.

'पीकविम्यामध्ये कृषीमंत्र्यांना किती पैसे मिळाले, बाजूच्या अधिकाऱ्यांना किती मिळाले हे तपासायला पाहिजे. विमा कंपन्या आल्या त्याच मुळात लुटायला आणि नफा कमवायला. पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला हरकत नाही. पण कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का?' असा रोखठोक सवालही बच्चू कडू यांनी शिवसेनेला विचारला आहे.

आघाडीवरही हल्लाबोल

शेतकरी प्रश्नावरून आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेताच भाजपमध्ये गेला आहे. आपल्या पक्षात अजून किती उरणार आहेत याची मोजदाद करतानाच ते दमले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आंदोलन कधी करणार?' असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे हे जन-आशीर्वाद यात्रेद्वारे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

VIDEO: 'स्वबळावर निवडणूक लढवूनही 170 जागा येतील'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading