Home /News /maharashtra /

सगळे मंत्री बाजूला, बच्चू कडू लागले कामाला; पहिल्याच दिवशी दिला सरकारी बाबूंना दणका

सगळे मंत्री बाजूला, बच्चू कडू लागले कामाला; पहिल्याच दिवशी दिला सरकारी बाबूंना दणका

महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर बच्चू कडू कामाला लागले आहे

  संजय शेंडे, प्रतिनिधी अमरावती, 01 जानेवारी : महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर बच्चू कडू कामाला लागले आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी दोन नायब तहसीलदावर कारवाई कारवाई केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू  आज अमरावतीत दाखल झाले. त्यानंतर दर्यापूर इथं बच्चू कडूंनी भेट दिली. यावेळी दोन नायब तहसीलदारावर धडक कारवाई केली आहे. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षक सपना भोवते  आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा)प्रमोद काळे यांच्यावर कारवाईचे आदेश आहे. बच्चू कडू यांनी दोन्ही नायब तहसीलदारावर निलंबनाचे आदेश दिले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अधिकारी गटात एकच खळबळ उडाली. याआधीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. आता राज्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली झलक आज पाहण्यास मिळाली. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांचं  शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ज्या ठिकाणावरून आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये आंदोलन उभं केलं होतं. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला बच्चू कडू यांनी अभिवादन केलं. अमरावती  शहरात आल्यानंतर आपला रुग्णसेवेचा वसा कायम ठेवत हॉलिक्रोस अनाथालयात जाऊन अनाथ मुलांना अन्नदान करून  स्वतः घास भरवून दिला. अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन रुग्णांना अन्नदान करून आपला जनसेवेचा आणि रुग्णसेवेचा वसा कायम ठेवला. मंत्रिपदाची पुर्ण शक्तीही जनसेवा आणि रुग्णसेवेसाठी लागली पाहिजे यासाठीच बच्चू कडू यांनी प्रथमतः जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना भेटी देऊन अन्नदान  केलं. त्याआधी अमरावती येथील होली क्रॉस शाळेतील जे मानसिक रुग्ण होते त्यांना सुद्धा भेटून अन्नदान केलं. स्मारक स्मार्ट केल्यापेक्षा रुग्णालय स्मार्ट करा असा संदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला. सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये दोन लाखांच्या वर जर एक हजार रुपये असले तरी तरी तो कर्जमाफी बसत नाही. पण दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीतील दुसरा टप्पा करतो आहे, असं  स्पष्ट केलं आहे, त्यामुळे कर्जमाफीमध्ये राज्यातील पन्नास टक्के शेतकरी हे कर्जमुक्त होणार आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसंच आधीच्या कर्जमाफीमध्ये दीड लाख रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही. हा सुद्धा मोठा घोळ आहे. ज्या लोकांनी दोन लाखाच्या वर कर्ज घेतले आहे. त्या लोकांनाही काही वन टाइम पैसे भरून सेटलमेंट करता येईल काय हा सुद्धा शासनाचा विचार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने होत असलेल्या टीकेवरील प्रश्नाला बगल देत, 'चांगल्या गोष्टीकडे बघा. काय वाईट झाले त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करा. त्याला अधिक चांगलं काम करता येईल याकड़े लक्ष द्या', असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Amravati, Bacchu kadu, Maharashtra cabinet expansion, Maharashtra CM, Shiv sena

  पुढील बातम्या