भाजप नेत्यांच्या खेळीवर बच्चू कडू संतापले, केला जोरदार 'प्रहार'

भाजप नेत्यांच्या खेळीवर बच्चू कडू संतापले, केला जोरदार 'प्रहार'

'इतक्या खालच्या पातळीवर उतरून राजकारण केलं तर जनता तुम्हाला सहन करणार नाही. लोकं दारात सुद्धा उभं करणार नाही'

  • Share this:

अमरावती, 26 मे :  सध्या देशात आणि राज्यात कोरोनांने थैमान घातले आहे. त्यामुळे सध्या सर्व यंत्रणा ही कोरोनाशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. मात्र, विरोधीपक्ष अतिशय खालच्या स्तरावर आणि बालिश राजकारण करत आहे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे. एवढंच नाहीतर भाजपमध्ये ढेरे दाखल झालेले नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याती मागणी केली आहे.

भाजप नेत्यांच्या राजकारणावर प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या शैलीत भाजपवर सडकून टीका केली आहे.

'राज्यात कोरोनाचे संकट असताना  भाजप नेत्यांकडून अत्यंत घाणरेडे राजकारण केले जात आहे. सत्तेची इतकी लालसा असू नये. राज्यात अत्यंत अशी वाईट अवस्था आहे. अशा परिस्थितीत राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. जर आणखी खालच्या पातळीवर उतरून राजकारण केलं तर जनता तुम्हाला सहन करणार नाही. लोकं दारात सुद्धा उभं करणार नाही' अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

हेही वाचा -विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेशचा डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

तसंच, 'सध्याच्या परिस्थितीत जनतेची काळजी घेणे गरजेचे आहे. पण भाजपचे उठसूठ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहे.  मुळात राज्यपाल हे सवैधानिक पद आहे. मात्र, विरोधी पक्ष त्यांना भाजप कार्यकर्ता असल्यासारखे वागणूक देत आहे. त्यामुळे हे राज्यासाठी अत्यंत घातक आहे', अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार स्थिर - बाळासाहेब थोरात

दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.  'सरकारच्या स्थिरतेविषयी विनाकारण गैरसमज निर्माण केला जात आहे. पण आमचे महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. आमच्यात समन्वय नाही अशी कोणतीही बाब नाही. आमची रोज अनेक वेळा चर्चा होत असते, भेठीगाठी होत असतात. त्यामुळे सरकार अस्थिर असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे',  असं थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरातांचा राणेंना टोला

'भाजपची नेते मंडळी असंतुष्ट आहे. सत्तेची लालसा त्यांना आहे. त्यांना असं वाटतं की, काही तरी करावं आणि सरकार पाडावं. तसे पाहिले तर त्यांच्याकडे पूर्ण संख्याबळ नाही. त्यामुळे सरकारला त्रास देण्यासाठी त्यांचा रोज खटाटोप सुरू आहे. उलट कोरोनाच्या परिस्थितीत मदत करण्याची गरज आहे. पण, भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत आहे. त्यांच्या या भेटींमुळे सरकारला काही फरक पडणार नाही, असं म्हणत थोरात यांना नारायण राणेंसह भाजप नेत्यांना  टोला लगावला.

संपादन - सचिन साळवे

First published: May 26, 2020, 3:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading