Home /News /maharashtra /

बबनराव लोणीकरांनी हिरोईन शब्दाचा लावला अजब शोध, पाहा हा VIDEO

बबनराव लोणीकरांनी हिरोईन शब्दाचा लावला अजब शोध, पाहा हा VIDEO

हिरोईन शब्दाचा अर्थ माझ्यामते वाईट नाही. हिरोईनला मराठीमध्ये नायकी असं म्हटलं जातं.

  जालना, 02 फेब्रुवारी : भाजपचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर आपल्या बेतला वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडले.  महिला तहसीलदाराचा हिरोईन म्हणून उल्लेख करत लोणीकरांनी पुन्हा एकदा आपल्या बेतलापणाचा पराक्रम गाजवला. एवढंच नाहीतर आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यावर  जब पद्धतीने सारवासारवही केली. परतूर तालुक्यातील देवगाव येथे शनिवारी पार पडलेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना महिला तहसीलदारांना बबनराव लोणीकर यांनी चक्क हिरोईनची उपमा दिली होती.  त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल झाली आहे. 'शेतकरी मोर्चासाठी आपण हिरोईन आणू नसता तहसीलदार मॅडम आहेत' अशा वक्तव्याची बबनराव लोणीकरांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर लोणीकरांवर चहुबाजूंनी टीका झाली.   त्यानंतर लोणीकर यांनी आपल्या विधानाचं स्पष्टीकरण देत हिरोईन शब्दाचा अर्थच अजबपद्धतीने समजून सांगितला. हिरोईन शब्दाचा अर्थ माझ्यामते वाईट नाही. हिरोईनला मराठीमध्ये नायकी असं म्हटलं जातं. नायिका म्हणजे कर्तबगार महिला असाही होतो. आमच्या मंठ्याच्या तहसीलदार या कर्तबगार आहे, डॅशिंग आहे,  त्यामुळे असं वक्तव्य केलं, असा खुलासा लोणीकर यांनी केला. तसंच हिरोईन हा शब्द चांगल्या भावनेनं वापरला आहे. चांगल्या अधिकाऱ्याला किंवा महिला अधिकाऱ्याला डॅशिंग किंवा हिरो किंवा हिरोईन म्हणत असतो. तुम्ही हे गुगलवर शोधून बघा, याचा वापर चांगल्यासाठी केला आहे, असंही लोणीकर म्हणाले. तसंच, विरोधकांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला असून त्याचं भांडवल करू नये, हिरोईन या शब्दाचा अपमान करू नका, असा सल्लाच लोणीकर यांनी विरोधकांना दिला आहे. काय म्हणाले होते लोणीकर? या मोर्चाला कोण बोलवायचं ते सांगा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, चंद्रकांतदादा पाटील असो,  की सुधीर मुनगंटीवार कुणाला मोर्चासाठी आणायचं ते तुम्ही फक्त सांगा असं लोणीकर म्हणाले. नंतर त्यांची जीभ घसरली. या मोर्चासाठी कुठली हिरोईन आणायची ते का सांगा? असा सवाल त्यांनी लोकांना केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. कुणी हिरोईन मिळाली नाही तर तहसिलदारालाच घेऊन येतो. त्याच हिरोईनसारख्या दिसतात असंही त्यांनी सांगितलं. लोणीकरांच्या या वक्तव्याचा महिला संघटनांनी निषेध केलाय. यातून भाजपच्या नेत्यांची मानसिकता दिसून येते अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलीय.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: BJP

  पुढील बातम्या