एकाने राष्ट्रवादीच्या तिकिटावर तर दुसऱ्याने पाठिंब्यावर...दोन भावांनी गाठली विधानसभा!

एकाने राष्ट्रवादीच्या तिकिटावर तर दुसऱ्याने पाठिंब्यावर...दोन भावांनी गाठली विधानसभा!

सोलापूर जिल्ह्यातील दोन भाऊ विधानसभेत आमदार म्हणून दिसणार आहेत.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, करमाळा, 26 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून नात्या-गोत्यांचं वर्चस्व राहिलं आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही घरात असणारी नातीगोती आता विधानसभा सभागृहात दिसणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोन भाऊ विधानसभेत आमदार म्हणून दिसणार आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगावचे शिंदे घराण्यातील दोन बंधूंनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा बबनराव शिंदे आमदार झाले आहेत. गत वर्षी 39 हजार मताच्या मताधिक्याने विजयी झालेले बबनराव शिंदे यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत यंदा तब्बल 68 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीचे वजनदार नेते अशी बबनराव शिंदे यांची ओळख आहे. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी माढा आणि पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये समृध्दी आणली. त्यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे हे सुध्दा करमाळा विधानसभा मतदारसंघातून 5 हजार मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादी आणि एका भाजप नेत्याने पाठींबा दिल्यानंतर संजयमामा शिंदे यांना विजयी होण अवघड नव्हते. आता आम्ही दोघे भाऊ एकाच वेळी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात काम करणार याचा आनंद आम्हाला आहेच. अशी भावना दोघांनीही व्यक्त केली. शिंदे बंधू राहत असलेल्या निमगावात यंदा दोन बंधू निवडून असल्याने एकदा नव्हे तर दोनदा दिवाळी साजरी झाली.

विधानसभा सभागृहात आता जे नातेवाईक नातीगोती असतील, त्यात या दोन भावांचा समावेश तर असेलच पण आमदार बबनराव शिंदे यांचे जावई आणि पुणे जिल्ह्यातील भोर चे आमदार संग्राम थोपटे सुध्दा असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नात्यागोत्यांचं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

VIDEO : उदयनराजेंना आस्मान दाखवणारे 'पैलवान' पवारांच्या भेटीला, रंगला गप्पांचा फड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading