शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शीतल आमटे (sheetal amte karajgi) यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शीतल आमटे यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

चंद्रपूर, 01 नोव्हेंबर : कुष्ठ रोगांच्या जखमेवर फुंकर घालणारे ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी (sheetal amte karajgi) यांनी आनंदवनात आत्महत्या केल्याची मनाला चटका लावून जाणारी घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर आमटे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शीतल आमटे यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शीतल आमटे यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया प्रसार माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, 'आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण धक्कामध्ये आहोत. सध्या काहीही सांगण्याच्या मन:स्थितीत नाही' असं सांगत त्यांनी पुढे काही बोलण्यास नकार दिला.

डॉ.शीतल आमटे यांनी सोमवारी सकाळी  आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी!

मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ लाईव्ह करून आनंदवनातील महारोजी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.

Published by: sachin Salve
First published: December 1, 2020, 11:34 AM IST
Tags:

ताज्या बातम्या