Home /News /maharashtra /

खरं की खोटं: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी दान केले 50 हजार कोटी?

खरं की खोटं: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी दान केले 50 हजार कोटी?

अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान करण्याची घोषणा केली. अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

  नवी दिल्ली, 27 मार्च : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 50 हजार कोटी दान करण्याची घोषणा केली. अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अझीम प्रेमजी यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. अशा पोस्टचा सोशल मीडियावर धुमाकूळ झाल्यानंतर विप्रो कंपनीकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या कंपनीचे 52,750 कोटी किंमतीचे शेअर्स चॅरिटीला दान केले होते. एकूण संपत्तीच्या 34 टक्के भाग त्यांनी दान दिली होती. ही संपत्ती 2019 साली दान करण्यात आली होती. त्यावेळी जगभरात एवढी मोठी किमत चॅरिटीला देणारी  अझीम प्रेमजी पहिले होते. सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं स्पष्टीकरण अझीम प्रेमजी यांच्याकडून देण्यात आलं आहे. अझीम प्रेमजी फाउंडेशनचे शिक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्था देशातील अनेक क्षेत्रात कार्यरत असून त्या-त्या राज्य सरकारसोबत भागिदारी केली आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनचे कार्य देशाच्या उत्तर-पूर्व राज्यांशिवाय कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पुदुत्चेरी, तेलंगाणा आणि मध्य प्रदेशाही विस्तारले आहे. हे वाचा-पंतप्रधान इमरान खान यांना कोरोनाची लागण? एका बातमीने पाक हादरलं भारतातील उद्योगपतींचं मोठं सहकार्य अवघं जग कोरोनाशी (Coronavirus) सामना करत आहे. सरकारने सर्वांना घरात राहुन देश वाचवण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी नक्कीच मोठ्या आर्थिक साहाय्याची गरज आहे. अशावेळी देशातील नामांकित व्यावसायिक आणि उद्योजकांनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. मुकेश अंबानी, CMD रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. यासोबतच काही NGO बरोबर पार्टनरशीप करत विविध शहरामध्ये मोफत अन्नदान केले आहे. रिलायन्सने कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 बेडचं सेंटर मुंबईमध्ये सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये बनवलं आहे. दोन आठवड्यात ते तयार करण्यात आले असून केवळ कोरोना ग्रस्तांसाठी असणारं ते देशातील पहिलं रुग्णालय असेल. महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. महिंद्रा यांची कंपनी अत्याधुनिक व्हेंटिलेटर तयार करीत असून ज्याची किंमत केवळ 7,500 रुपये इतकी असणार आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'सध्याच्या अत्याधुनिक मशीनची किंमत 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असते. आम्ही आयसीयू व्हेंटिलेटर बनवणाऱ्या एका स्वदेशी कंपनीसोबतही काम करत आहोत.' अनिल अग्रवाल, चेअरमन, वेदांत रिसोर्सेस - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाशी दोन हात करण्यासाठी मदत म्हणून उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. #DeshKiZarooratonKeLiye असा हॅशटॅग वापरत त्यांनी हे ट्वीट केलं. ‘यावेळी आपल्या देशाला आपली गरज आहे. खूप लोकांना य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. ज्यांना दिवसाच्या कामानुसार मजुरी मिळते त्यांची अधिक चिंता आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मदत करू’ असं ट्वीट त्यांनी केलं. हे वाचा-कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत आज आणखी नवे 5 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 159 वर टाटा समूह : टाटा समूहाने समूहातील सर्व कंपन्यांना आश्वासन दिले आहे की, मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी त्यांच्या इथे फुलटाइम आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कपात न करता पगार देण्यात येणार आहे. राहुल बजाज, चेअरमन, बजाज ग्रृप – राहुल बजाज यांनी कोरोनाशी लढण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. 200 हून अधिक NGO बरोबर पार्टनरशीप करून कोरोनासाठी लागणारी संसाधन देखील ते उपलब्ध करून देणार आहेत. पुण्यातील हॉस्पीटलमधील आरोग्य विषयक इन्फ्रास्ट्रक्चर देखील कंपनीकडून सुधारण्यात येणार आहे. पंकज एम मुंजाल, चेअरमन, हीरो मोटर्स- सहाय्यता निधीमध्ये 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांची कंपनी विविध राज्यामध्ये काम करण्यासाठी पोहोचत असल्याचंही ते म्हणाले. अनुपमा नडेला - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची पत्नी अनुपमा नडेला यांनी तेलंगणा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. हे वाचा-अमेरिकेत 24 तासांत 18 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 345 लोकांचा मृत्यू

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

  पुढील बातम्या