'कोरोना'वर गावठी उपाय, जिल्हाधिकारी कार्यालयातच जाळल्या शेणाच्या गोवऱ्या व धूप

'कोरोना'वर गावठी उपाय, जिल्हाधिकारी कार्यालयातच जाळल्या शेणाच्या गोवऱ्या व धूप

कोरोना व्हायरसचा बिमोड करण्यासाठी आख्ख जग विज्ञानाचा आधार घेत उपाय शोधत असताना उस्मानाबाद जिल्हाप्रशासनाने मात्र एक गावठी उपाय शोधला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद,12 मार्च: कोरोना व्हायरसचा बिमोड करण्यासाठी आख्ख जग विज्ञानाचा आधार घेत उपाय शोधत असताना उस्मानाबाद जिल्हाप्रशासनाने मात्र एक गावठी उपाय शोधला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच कोरोना व्हायरस पळवण्यासाठी चक्क शेणाच्या गोवऱ्या व धूप जाळण्यात आले.

आयुर्वेदाचा हवाला देत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरच हे शेणाच्या गोवऱ्या व धूप जाळण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना केल्या आहेत.

हेही वाचा..कोरोना व्हायरसवर विकसित केली लस, इस्रायलमधील शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश

सिव्हिल सर्जननी पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय..

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक केल्याचा आयुर्वेदिक महाविद्यालयाने दावा केला आहे. कोरोनाच्या उयाययोजनेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्या शेणाच्या गोवऱ्या व धूप जाळण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हा सगळा प्रकार पाहून सिव्हिल सर्जन आणि पोलिस अधीक्षकांची चांगलीच गोची झाली. त्यांनी या पत्रकार परिषदेतून अक्षरश: काढता पाय घेतला. या बाबत पत्रकारानी सिव्हिल सर्जन यांना विचारणा केली असता या प्रात्याक्षिकाला कुठलाच शासकीय आधार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा..मास्क आणि सॅनिटायझरची वाढीव दराने विक्री, पुण्यातील 4 मेडिकल स्टोअर्सवर कारवाई

दुसरीकडे हे प्रतिक्षिक दाखवणारे मात्र आपल्या मतावर ठाम आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना विचारले असता उत्तर देताना त्यांचीही चांगलीच अडचण झाली. दरम्यान, कोरोना व्हायरस पळण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे, का अशा प्रकारे गोवऱ्या जाळव्या असा प्रश्न उपस्थिताना पडला होता.

हेही वाचा..'दारू प्या आणि कोरोनापासून दूर राहा' काय आहे यामागचं सत्य?

First published: March 12, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading