निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले...

निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले...

'जय पराजयाच्या दृष्टीनं निर्णयाकडे पाहू नये', सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं केलं स्वागत.

  • Share this:

नागपूर, 09 नोव्हेंबर: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. गेल्या अनेक दशकापासून सुरु असलेल्या या वादावर न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश देताना कोर्टाने मुस्लिमांसाठी अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचा निर्णय दिला आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने वादग्रस्त जागा राम जन्मभूमी न्यासाला सोपवली आहे.

'सुप्रीम कोर्टानं 5 एकर जागा मशीद उभारण्यासाठी दिली आहे. सरकार त्याचं पालन करेल. राम मंदिर उभारण्यासाठी जी ट्रस्ट स्थापन केली जाणार आहे त्याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल. आमचं काम फक्त राम मंदिर उभं राहवं. मधल्या काही कालावधीमध्ये काही कारणांमुळे तोडगा काढणं शक्य झालं नाही. त्यामुळे हा वाद न्यायप्रविष्ट राहिला. मात्र आता न्यायालयानं निर्णय देऊन वादावर पडदा घातला आहे. या निर्णयाचं शांतपणे स्वागत करायला हवं. लोकांनी संयमानं आनंद साजरा करावा, हा निकाल जय पराजयाचा नाही तर कोर्टाच्या निर्णय़ानं न्याय़ मिळाला आहे. भूतकाळातील झाल्या-गेल्या सर्व गोष्टी विसरून एकत्र य़ेऊऩ राम मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवा'. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रामजन्मूभूमी संदर्भात ज्यांनी विचार मांडले, सत्य आणि न्याय देणारे तसच न्यायाधीश आणि सर्व पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

सुप्रीम कोर्टानं काय दिला निकाल वाचा ठळक मुद्दे.

मंदिर आणि मशिदीच्या बांधकामामध्ये 400 वर्षांचं अतंर आहे. मुस्लीम त्या जागेला नमाज पठणाचे स्थळ मानतात तर त्या जागेवर प्रभू रामचंद्रांचा जन्म तिथं झाल्याची हिंदूंची श्रद्धा आहे असंही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.

अयोध्या प्रकरणात हिंदू पक्षाने अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज सादर केले. हिंदूंनी केलेला दावा खोटा नाही. रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख. याशिवाय चौथरा आणि सिता की रसोई याठिकाणी असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हिंदूंनी त्या जागेचे महत्त्व दर्शविण्यासाठी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड आणि गॅझेटियर रेकॉर्ड दिले.

केवळ विश्वास आणि श्रद्धा यांच्या जोरावर मालकी हक्क सांगता येणार नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचा खटला कायम ठेवता येतो. परंतु प्रतिकूल ताबा मिळवण्याचा हक्क मुस्लिम सांगू शकत नाहीत. बाह्य अंगणात हिंदूंचा ताबा आहे. मुस्लीमांना पर्यायी जागा देण्यात येणार असून काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना जमीन मिळेल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

एएसआयच्या अहवालाबाबतही सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली. हा अहवाल अंदाज किंवा फक्त एक अंदाज म्हणून नाकारता येणार नाही. एएसआय क्रेडेन्शियल संशयाच्या पलीकडे आहे आणि याचा शोध दुर्लक्षित करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

एएसआयच्या अहवालात मूलभूत रचना विशिष्ट मंदिर असल्याचे म्हटले गेले नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. मीर बाँकीनं बाबरच्या काळात मशिद बांधली. याशिवाय एएसआयने इदगाहचा उल्लेख केलेला नाही. खोदकामात इस्लामिक ढाचा असल्याचे पुरावे आढळले नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

VIDEO : निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या