• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सांगली: मोठ्या मनाचा दिलदार माणूस; लाडक्या लेकीच्या लग्नाचा डामडौल टाळून चौघींचे उभारले संसार

सांगली: मोठ्या मनाचा दिलदार माणूस; लाडक्या लेकीच्या लग्नाचा डामडौल टाळून चौघींचे उभारले संसार

सांगलीतील मुनीरभाई यांनी सामाजिक बांधिलकी जपत चार कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नातील डामडौल टाळून चार गरीब कुटुंबातील मुलींचे संसार उभारले आहेत.

 • Share this:
  सांगली, 09 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहीचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशा परिस्थितीत घरातील मुलीचं लग्न कसं करायचं हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात सांगलीतील मुनीर पटेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत चार कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नातील डामडौल टाळून चार गरीब कुटुंबातील मुलींचे संसार उभारले आहेत. सांगलीतील रहिवासी असणारे मुनीर पटेकरी यांची लाडकी लेक खदेजा हिचा निकाह अलीकडेच निश्चित झाला आहे. खदेजाचं पुण्यातील उमैर येलूरकर याच्याशी शुक्रवारी निकाह पार पडणार आहे. दोघंही उच्चशिक्षित अभियंते असून पुरोगामी विचारांचे आहेत. घरातील पहिलंच लग्न असल्याने मुनीर यांनी मोठा खर्च करण्याची तयारी केली होती. पण येलुरकरांनी साधेपणाची विनंती केली. त्यामुळे पटेकर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा सामाजिक कामासाठी खर्च करण्याचं ठरवलं. हेही वाचा-विहिरीत पडलेल्या महिलेला जीवदान; अवघ्या साडेतीन मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दरम्यान, सांगलीतील काही गरीब कुटुंबातील तरुणींचे विवाह पैशांअभावी अडल्याची माहिती त्यांना समजली. यावेळी पटेकर यांनी कसलाही विचार न करता संबंधित कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. विशेष म्हणजे मदत कोणी केली? हे कळू नये म्हणून त्यांनी अन्य व्यक्तींद्वारे ही मदत गरीब कुटुंबीयांपर्यंत पोहोचवली आहे. हेही वाचा-आजीबाईंनी पहिल्यांदाच खाल्ला पिझ्झा; खाताच चेहऱ्यावर दिले मजेशीर हावभाव, VIDEO त्यांनी संसारोपयोगी साहित्य खरेदी करून ही मदत त्रयस्थांमार्फत पोहोचवली आहे. तसेच ही मदत व्यक्तिगत नसून समाजबांधवांकडून केल्याची माहिती संबंधित कुटुंबीयांना सांगितली आहे. यामुळे त्यांचा स्वाभीमान देखील सांभाळला गेला. मुनीर यांनी ऐन कोरोना काळात गरीब कुटुंबीयांना लाख मोलाची मदत केल्याने अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: