'मुख्यमंत्रिपदा'बाबत वक्तव्य करू नका, युतीच्या आमदारांना नेत्यांची तंबी

'मुख्यमंत्रिपदा'बाबत वक्तव्य करू नका, युतीच्या आमदारांना नेत्यांची तंबी

अमित शहा, मुख्यमंत्री आणि माझ्यात सर्व गोष्टी ठरल्या आहेत. त्याची काळजी तुम्ही करू नका असंही उद्धव ठाकारे यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितलं.

  • Share this:

मुंबई 24 जून :  भाजप आणि शिवसेनेचं सध्या चांगलं सुरू असलं तरी मुख्यमंत्रीपदाबाबत वेगवेगळे सूत्र निघतात. भाजप आणि शिवसेनेचे नेते वेग वेगळी वक्तव्य करत असल्याने चुकीचा संदेश जातो त्यामुळे यापुढे कुणीही मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य करू नये अशी तंबीच आज युतीच्या आमदारांना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमित शहा, मुख्यमंत्री आणि माझ्यात सर्व गोष्टी ठरल्या आहेत. त्याची काळजी तुम्ही करू नका असंही उद्धव ठाकारे यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितलं. विरोधक ताकद कमी झाली असली तरी गाफील राहू नका असंही दोन्ही नेत्यांनी  आमदारांना सांगितलं. उमेदवारी कुणाला द्यायची, जागावाटप कसं करायचं याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री घेणार असल्याचंही आमदारांना सांगण्यात आलं.

उद्धव ठाकरे विधान भवनात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले. सध्या भाजप आणि शिवसेनेचं मिले सूर मेरा तुम्हाला चाललंय. तोच सूर विधान भवनातही बघायला मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही जोरदार तयारी करतेय. शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरेंची ही भेट होती. फक्त शिवसेनाच नाही तर भाजपचे मंत्री आणि आमदारांनीही त्यांचं स्वागत केलं. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या भेटीला आले आणि आपल्या दालनात आग्रहाने घेऊन गेले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वागत केलं. त्याच बरोबर भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनीही मुख्य प्रवेशद्वारावर उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं. त्यानंतर विधिमंडळ कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं. त्याच वेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करताच उपस्थित सर्वच आमदारांनी आश्चर्य व्यक्तं केलं. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या दालनात उद्धव ठाकरे गेले. तिथे त्यांनी आमदारांसबोत चर्चा सुरू असतानाच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व:ता येत उद्धव यांचं स्वागत केलं आणि त्यांनी आपल्या दालनात चर्चा करण्यासाठी आग्रहाने घेऊन गेले.

शिवसेना भाजपच्या बैठकी पूर्वीच दोन्ही पक्षातील दिलजमाई पाहून युती भक्कम असल्याचाच संदेश विरोधकानाही देण्यात आलांय. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांच्या बैठकीला बैठकीला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हजर होते.

First published: June 24, 2019, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading