'अवनी'चा एक बछडा अखेर जेरबंद, दुसऱ्याचा शोध सुरू!

'अवनी'चा एक बछडा अखेर जेरबंद, दुसऱ्याचा शोध सुरू!

सी 1 आणि सी 2 अशी या बछड्यांची नावं आहेत.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 22 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अवनीच्या 2 बछड्यांपैकी एक बछडा अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. सी 1 आणि सी 2 अशी या बछड्यांची नावं आहेत. त्यातील मादी बछडा आज यवतमाळच्या जंगलातून अखेर जेरबंद करण्यात आला.

या बछड्याला जेरबंद केल्यानंतर त्याची रवानगी नागपूरच्या गोरेवा़डाला करण्यात आली आहे. तर दुसरा बछड्याचा शोध वनविभागाकडून अजूनही सुरूच आहे.

अवनी वाघिणीला नरभक्षक ठरवून 2 नोव्हेंबर रोजी गोळ्या झालून ठार मारण्यात आलं होतं. यानंतर अवनीच्या मृत्यूनंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. अवनीची नियमबाह्य पद्धतीनं हत्या करण्यात आल्याची बाब चौकशी अहवालात पुढे आली. यानंतर अवनीच्या दोन्ही बछड्यांचा शोध सुरू होता.

चार हत्तींच्या मदतीने शोध मोहीम

टी 1 वाघिणीच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाची अंजी परिसरात बुधवारपासून मोहीम सुरू केली होती. यासाठी मध्यप्रदेशातील कान्हा अभयारण्यातील शिवा, पवनपुत्र,  चंचलकली, हिमालय या चार हत्तींना आणण्यात आलं होतं. पशुवैद्यकीय अधिकारी यांचे दोन पथक या मोहिमेत सहभागी झाले आहे. अंजी या परिसरातील संपूर्ण 80 एकर परिसरात जिथे तार कुंपण केलं आहे. त्या भागातील अंजी परिसरात वनअधिकारी आणि कर्मचारी वगळता कुणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या जंगल भागात जाण्यासाठी असलेल्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

अखेर आज या मोहिमेला मोठं यश आलं आहे. अवणीच्या दोन बछड्यांपैकी एकाला जेरबंद करण्यात आलं आहे. सी 1 आणि सी 2 नामक वाघिणीचे दोन बछडे आहेत. त्यातील मादी बछड्याचा जेरबंद केलं आहे. आता दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

==================================

First published: December 22, 2018, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading