रिक्षावर पोट भरणारा तरुण भाडं मिळालं म्हणून रात्री घरातून बाहेर पडला आणि...

रिक्षावर पोट भरणारा तरुण भाडं मिळालं म्हणून रात्री घरातून बाहेर पडला आणि...

मानवतमध्ये एका 33 वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

  • Share this:

विशाल माने,प्रतिनिधी

मानवत, 06 फेब्रुवारी :  परभणीतील मानवतमध्ये  एका 33 वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मानवत शहरात राहणाऱ्या युवकाचा मृतदेह तालुक्यातील ताडबोरगाव गावाच्या शिवारात आढळून आला आहे.

व्यवसयाने  रिक्षाचालक असलेला अख्तर जलील शहा (वय 33) हा तरुण बुधवारी रात्री घरातून भाडे आहे. असं सांगून आठ वाजता बाहेर पडला होता. त्यानंतर उशिरापर्यंत तो घरी आलाच नाही. अख्तर घरी न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. पण तो कुठेही आढळला नाही

अखेर घरच्या व्यक्तींनी  सकाळी पोलिसांमध्ये अख्तर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, ताडबोरगाव शिवारामध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. अख्तरच्या कुटुंबांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो अख्तरचा मृतदेह असल्याचं समोर आलं.

अख्तरची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं अख्तरची हत्या का आणि कशासाठी केली याचा पोलीस शोध करत आहे.

महिलेला जिंवत जाळताना पसरली दुर्गंधी, नंतर मारेकऱ्यांनी लटकावले फासावर

दरम्यान, आज नवी मुंबईत  एका 55 वर्षीय महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुर्गंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी महिलेला फासावर लटकावून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मात्र या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने तर्कवितर्क मांडले जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, पनवेलमधील दुन्द्रे गावात ही धक्कादायक घटना आहे. शारदा माळी असं मृत महिलेचे नाव आहे. मारेकऱ्यांनी शारदा माळी यांना आधी जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्घंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना फासावर लटकावून त्यांची निर्घृण हत्या केली, असा आरोप शारदा माळी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पाच संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यात चार दिवसांत महिलेला जाळून मारण्याची तिसरी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

First published: February 6, 2020, 6:57 PM IST
Tags: parbhani

ताज्या बातम्या