बदलापूरमध्ये मिळाला 'रिक्षाचालकांना' बोनस

बदलापूरमध्ये मिळाला 'रिक्षाचालकांना' बोनस

बदलापूरमध्ये रिक्षा संघटनेकडून गेल्या पंधरा वर्षांपासून बोनस योजना राबवली जातेय. रोजच्या कमाईतल्या पैशांतून थोडी थोडी बचत करून रिक्षावाले संघटनेकडं पैसे जमा करतात. दिवाळीला ते पैसे बोनस म्हणून मिळातात

  • Share this:

बदलापूर,13 ऑक्टोबर: रिक्षाचालकाला बोनस मिळालाय म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असतील. पण हे खरं आहे. बदलापुरातल्या 274 रिक्षाचालकांना 25 लाखांचा बोनस मिळालाय.

बदलापूरमध्ये रिक्षा संघटनेकडून गेल्या पंधरा वर्षांपासून बोनस योजना राबवली जातेय. रोजच्या कमाईतल्या पैशांतून थोडी थोडी बचत करून रिक्षावाले संघटनेकडं पैसे जमा करतात. दिवाळीला ते पैसे बोनस म्हणून मिळातात. यंदा बदलापूरातल्या रिक्षावाल्यांनी जवळपास पंचवीस लाख रुपये बोनस स्वकष्टार्जित बोनस मिळवला आहे.सुखदेव अहिरे या रिक्षाचालकांना तर तब्बल 1 लाखाचा बोनस मिळाला आहे.

असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या दिवाळीला बोनसच्या नावानं नेहमीच शिमगा असतो. पण बदलापूरचे रिक्षावाले वर्षभर नियोजन करतात त्यामुळेच त्यांची दिवाळी खास होऊ लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading