तरुणाचा अतिउत्साह अंगलट, पर्यटकांनी वाचवला जीव

तरुणाचा अतिउत्साह अंगलट, पर्यटकांनी वाचवला जीव

  • Share this:

शिवाजी गोरे, गुहागर

13 एप्रिल :  बऱ्याचदा फिरायला गेलेले लोक अतिउत्साह दाखवतात. आणि आपला जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा प्रकार झाला गुहाघरमध्ये. कराडमधला एक तरूण गुहागरच्या बामणघळीच्या समुद्र खाचीत पडला. त्यानंतर पार पडलं एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन.

वेळ दुपारी 2 वाजता

ठिकाणा - बामण घळ, गुहागर

कराडचे तरुण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला होते. आणि त्यातील एक तरूण अतीउत्साहाच्या भरात या घळीत पडला. आणि हा अतीउत्साह जीवावर बेतणार एवढ्यात आजू बाजूचे तरुण एकत्र आले आणि सुरू झालं एक रेस्क्यू ऑपरेशन.

मग त्या तरुणाला वाचवण्यासाठी मित्रांची धडपड सुरू झाली. त्याच्या मित्रांनी त्याला पकडण्यासाठी पाय दिला. पण वजन पेलत नसल्यानं त्याला वर काढता येईना. तो वाचवणारा तरूणच खाली पडतोय की काय अशी भीती वाटायला लागली होती. तेवढ्यात तीथं भाडं घेऊन गेलेला रक्षाचालक निरंकार गोयथळे त्याच्या मदतीला धावला. निरंकार जे भाडं घेऊन गेला होता त्यातील कल्याणचे दोन तरूण यांनी निरंकारला सपोर्ट केला. आणि एक साखळी तयार झाली. आता या तरूणाला वाचवता येईल असं वाटत होतं. मात्र उसळणाऱ्या लाटा काही चालू देत नव्हत्या. हात पाय देऊन या तरुणांनी जीवाच्या आकांतानं त्याला ओढण्याचा प्रयत्न सुरू केला, पण काही यश मिळत नव्हतं.

शेवटी बुडणाऱ्या तरुणाच्या हातात वरच्या साखळीतल्या तरुणाचा हात आला. आणि आता त्याला सहज बाहेर काढणं शक्य होईल असं वाटत असतानाच पुन्हा एक खळाळणारी लाट आली आणि हात हातातून सटकला. तो तरूण पुन्हा पाण्यात पडला. लाट ओसरली पुन्हा हात दिला. आता हा तरूण थोडासा वरती यायला लागला होता. या वेळी त्याला वाचवण्यात यश मिळेल असं वाटत असतानाच पुन्हा एक वेगाची लाट उसळली आणि तो तरुण पुन्हा खचीत पडला. वाचवणाऱ्यांनाही काही सुधरेना. पुन्हा एकदा पाय देण्याचा आणि वर येण्याचा केविलवाणा प्रयत्न हे तरुण करत होते. एक ना अनेक प्रकारे शर्थीचे प्रयत्न झाले. पण या तरुणांना यश मिळेना. शेवटी रिक्षाचालक निरंकारने बाजूला उभ्या असणाऱ्या एका तरूणीकडे ओढणी मागीलती, त्या तरूणीने क्षणाचाही विलंब न करता पुढे सरसावत आपली ओढणी भिरकावली.. मात्र ती ओढणीही कमी पडायला लागली. पुन्हा काही महिलांकडे ओढणी मागीतली मात्र काहींनी ओढणीही द्यायला नकार दिला. शेवटी मोबाईल वर शुटींग करणारी महिला पुढे आली आणि त्यांनी ओढणी या तरुणांना दिली. दोन ओढणी एक्तर बांधल्यानं या तरुणाला वाचवण्यात यश आलं.

आपण फिरायला जातो. आनंद लुटायचा असतो मजा करायची असते, सगळं मान्य आहे. पण एवढेही बेदरकार वागू नका की आपल्य़ा जीवावरच आपत्ती येईल.. आणि मोबाईलच्या जमान्यात हा व्हिडीओ काढला पण हा व्हिडोओ काढणाऱ्याला मदतीला धावावं अशी गरज वाटली नाही हेही खेदजनकच.

First published: April 13, 2017, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading