ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं निधन, साहित्यक्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं आज संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. मुंबईत वांद्रेमधल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 08:06 PM IST

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं निधन, साहित्यक्षेत्रावर शोककळा

मुंबई, 31 ऑक्टोबर : ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं आज संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. मुंबईत वांद्रेमधल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरिजा कीर यांचं साहित्यात मोठं योगदान होतं.कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णनं अशा साहित्यप्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली. अनुराधा मासिकाच्या सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केलं. कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासींचं जीवन त्यांनी जवळून अनुभवलं.गिरिजा कीर यांचं 'जन्मठेप' हे पुस्तक त्यांनी 6 वर्षं येरवडा तुरुंगात जन्मठेप झालेल्या कैद्यांवर संशोधन करून लिहिलं आहे.

लोकप्रिय कादंबऱ्या

गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, झपाटलेला या गिरिजाबाईंच्या कादंबऱ्या लोकप्रिय आहेत. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं आहेत. त्यांनी बालसाहित्यावरही बरंच लेखन केलं आहे.

(हेही वाचा : पुणेकरांसाठी पुढील 3 दिवस महत्त्वाचे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा)

त्या उत्कृष्ट कथाकथनही करत असत. त्यांच्या कथाकथनाचे 2 हजारांहून जास्त कार्यक्रम देशां-परदेशांत झाले आहेत.

Loading...

गिरिजा कीर यांचा जन्म धारवाडचा. मुंबई विद्यापीठाची बी. ए. ची पदवी मिळवल्यानंतर गिरिजाबाईंच्या लेखनाला सुरुवात झाली. त्यांच्या लेखनाला अनेक मानांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

=======================================================================================

VIDEO: राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...