SPECIAL REPORT :...म्हणून किरणने डोक्यावरचे केसं काढले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक!

किरणनं घेतलेला निर्णय समाजात कितपत मान्य होईल हा ही प्रश्न होता. पण किरणनं घेतलेल्या निर्णयात तिच्या आई-वडिलांनीही तितकीच तोलामोलाची साथ दिली.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 10:19 PM IST

SPECIAL REPORT :...म्हणून किरणने डोक्यावरचे केसं काढले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल कौतुक!

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 05 नोव्हेंबर : केसाचं सौंदर्य जपण्यासाठी तरुणींमध्ये धडपड सुरू असते. परंतु, औरंगाबादमध्ये राहणारी किरण गिते यासाठी अपवाद ठरली आहे. तिने आपले केसं दान केले आहे. तिच्या या कृत्याचं सर्वच स्तारातून कौतुक होत आहे.

सलूनमध्ये असलेली ही तरूणी कोणतीही हेअर स्टाईल करण्यासाठी आलेली नाही. तर किरण गीते ही तिचे केस कॅन्सरग्रस्तांना देण्यासाठी आली. सौंदर्यात भर घालणारे हे तिचे केस सलूनमध्ये काढले जात आहेत. एका आकर्षक चेहऱ्यावरील सर्व केस हळूहळू काढण्यात आले.

किरणनं दान केलेल्या केसांचा विग तयार करून तो कॅन्सरग्रस्ताला दिला जाणार आहे. किरणच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.

किरणच्या एका मैत्रिणीला कॅन्सर असल्यानं तिच्या डोक्यावरचे केस काढले होते. यामुळे किरण दुखी होती. केस दान केले तर त्याचा विग करून तो कॅन्सरग्रस्तांना दिला जाऊ शकतो, हे कळाल्यानंतर किरणनं तशीच कृती केली.

Loading...

किरणनं घेतलेला निर्णय समाजात कितपत मान्य होईल हा ही प्रश्न होता. पण किरणनं घेतलेल्या निर्णयात तिच्या आई-वडिलांनीही तितकीच तोलामोलाची साथ दिली.

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या किरणवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कॅन्सरसारख्या रोगाशी लढणं सोपं नाही. मात्र किरण सारख्या युवती समाजात असतील तर हा ही एक आशेचाच किरण म्हणावा लागेल.

--------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...