औरंगाबादची कचरा समस्या हे पालिका आणि नेत्यांचं अपयश, कोर्टाने फटकारलं

औरंगाबादची कचरा समस्या हे पालिका आणि नेत्यांचं अपयश, कोर्टाने फटकारलं

तसंच इतक्या दिवसात दुसरी सोय का केली नाही असा सवालही खंडपीठाने विचारला.

  • Share this:

26 फेब्रुवारी : औरंगाबादची कचरा समस्या महापालिकेचं आणि राजकीय नेत्यांचं अपयश आहे. आंदोलनकर्त्यांची समस्या सहन करण्यापलीकडची आहे असं नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेला चांगलंच फटकारून काढलं. तसंच इतक्या दिवसात दुसरी सोय का केली नाही असा सवालही खंडपीठाने विचारला.

औरंगाबाद कचरा कोंडीच्या प्रश्नावर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू आहे. आज खंडपीठाने पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. महापालिकेनं जो 148 दिवसांचा आराखडा तयार केला त्यावर आमचा विश्वास नाही असं म्हणत कोर्टानं आराखडा फेटाळून लावला.

राज्य सरकारनं या समस्येत हस्तक्षेप करावा. राज्य सरकारच्या सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हमीपत्र द्यावे त्यानंतर विचार केला जाईल असं देखील कोर्टानं सांगितलं.

त्यामुळे उद्या दुपारपर्यंत सरकारच्या वतीनं हमी दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या प्रकरणी सुनावणी होईल.

First published: February 26, 2018, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading