मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'तू जो पायला असेल त्याच्यासोबत खूश रहा', ...अन् तरुणाने स्वत:ला संपवलं; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

'तू जो पायला असेल त्याच्यासोबत खूश रहा', ...अन् तरुणाने स्वत:ला संपवलं; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जवाहरनगर परिसरात एका तरुणाने टोकाचं पाऊलं उचललं आहे.

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जवाहरनगर परिसरात एका तरुणाने टोकाचं पाऊलं उचललं आहे.

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जवाहरनगर परिसरात एका तरुणाने टोकाचं पाऊलं उचललं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 5 फेब्रुवारी, अविनाश कानडजे :  औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जवाहरनगर परिसरात एका तरुणाने पत्र्याच्या घरात लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. मुकेश नागोराव गाव्हदे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाच्या खिशात पोलिसांना एक सुसाईड नोट देखील आढळून आली आहे. त्याने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून त्याने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय? 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश हा औरंगाबादच्या जवाहरनगर परिसरात भाड्याने रूम घेऊन राहत होता. तो केटर्सचं काम करतो. मुकेशचं मुळ गाव बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील चोंडी हे आहे. त्याने औरंगाबादमधील राहात्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या खिशात एक सुसाईड नोट आढळून आली आहे. ज्यामध्ये 'तू जो भी पायला असेल त्याच्या सोबत खूश रहा मी तुला कधी श्राप देणार नाही पिल्ली I love you.. sorry' असा मजकूर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : 3 महिन्यांच्या चिमुकलीला लोखंडी सळईचे चटके; अंधश्रद्धेमुळे गेला जीव

कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय 

दरम्यान या प्रकरणात मुकेशचा भाऊ लखन आणि नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, त्यांनी तशी तक्रार देखील पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published:

Tags: Aurangabad