मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दुकानात घुसून नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण, Live Video आला समोर

दुकानात घुसून नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण, Live Video आला समोर

क्राईम

क्राईम

आजकाल क्राईमच्याच्या अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असतात. यामध्ये ब्लॅकमेल, मारहाण, जीवघेणा हल्ला, नात्याला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना समोर येत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 7 फेब्रुवारी: आजकाल क्राईमच्याच्या अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असतात. यामध्ये ब्लॅकमेल, मारहाण, जीवघेणा हल्ला, नात्याला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना समोर येत असतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच औरंगाबादमधून आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे.

औरंगाबाद मध्ये एका लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानात महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. हा हल्ला करणारा या महिलेचा सोडून दिलेला नवरा आहे. या महिलेचे आपल्या नावऱ्यासोबत पटत नसल्याने ती त्याला सोडून माहेरी राहायला आली होती. स्वतः खाजगी नोकरी करून ती जगत होती. भावाच्या मुलाला वाढदिवसानिमित्त कपडे घायला गेली असता तिचा नवरा त्या ठिकाणी आला आणि त्याने तिला जबर मारहाण केली. मारहाणीत महिलेचा डोळा निकामी झाल्याची माहिती आहे. तिच्या हाताची दोन बोटं सुद्धा तुटली आहेत. पोलिसांत अजून गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.

औरंगाबादमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. महिलेसोबत झालेला जीवघेणा हल्ला कपड्याच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायर ल होत आहे. आता याप्रकणी पोलीस काय पाऊल उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अशी मारहाण आणि जीवघेणा हल्ला करण्याचा ही पहिलीट घटना नाहीये. या पहिलेही अशा अनेक घटना समोर आल्या असून पोलीसांनी घटनेची योग्य ती कारवाई केली आहे. मात्र असे प्रकार थांबण्याचं नाव घेत नसून दिवसेंदिवस यामध्ये वाढ पहायला मिळत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime, Crime news, Viral