मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिलांप्रमाणे पुरुषांवरही होतात अत्याचार! पाहा काय आहे 'त्यांची' मागणी, Video

महिलांप्रमाणे पुरुषांवरही होतात अत्याचार! पाहा काय आहे 'त्यांची' मागणी, Video

ज्याप्रमाणे महिलांच्या बाजूने कायदा आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या बाजूनेही कायदा असावा अशी मागणी पत्नी पीडित संघटनेकडून केली जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : महिलांप्रमाणे पुरुषांवरही शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पत्नी पीडित संघटनेकडे गेल्या पाच वर्षांमध्ये 9 हजार 753 जणांनी याप्रकरणी तक्रारी दिल्या आहेत. तर पोलीस आयुक्तालय तर्फे सुरु करण्यात आलेल्या भरोसा सेलमध्ये 10 महिन्यात 292 तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे महिलांच्या बाजूने कायदा आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या बाजूनेही कायदा असावा अशी मागणी जागतिक पुरुष दिनानिमित्त औरंगाबाद शहरातील पत्नी पीडित संघटनेकडून केली जात आहे.

जगभरामध्ये ज्याप्रमाणे जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा या पुरुष दिनाची पुरुष आणि मुलांची मदत अशी यावर्षीची थीम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांवरती शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता चार भिंतीच्या आत पुरुषांवरही अन्याय अत्याचार होतो. अत्याचार होत असताना पुरुषाला तक्रार करणे ही कठीण जातं. महिलांच्या बाजूने कायदा असल्यामुळे महिला या कायद्याचा सदुपयोग करण्याऐवजी अनेक महिला याचा दुरुपयोग करत असून यामुळे पुरुषांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत आणि यामुळेच औरंगाबाद शहरांमध्ये पत्नी पीडित संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे .

Video: वडापाव अनेक वेळा खाल्ला असेल, पण स्पेशल चटणीचा पाव वडा खाल्लाय?

10 महिन्यात 292 तक्रारी

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. औरंगाबाद शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलमध्ये गेल्या 10 महिन्यात 292 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 47 प्रकरणांमध्ये पोलिसांच्या वतीने समझोता  करण्यात आला आहे तर 150 प्रकरण हे न्यायालयात गेले आहेत.

पुरुषांच्या बाजूने असावा कायदा

महिलांवरती पूर्वी अत्याचार होत होते तेव्हापासून महिलांच्या बाजूने कायदा करण्यात आला आहे. महिलांच्या संरक्षणासाठी देण्यात आलेल्या कायद्याचा आता महिलांकडून दुरुपयोग होत आहे. यामुळे पुरुषांना पोलीस ठाण्यामध्ये जाऊनही अनेक वेळा न्याय मिळत नाही. यामध्ये पुरुषांच्या आयुष्याचं माती मोल होतं तर त्याच्या कुटुंबीयांनाही या कठीण प्रवासातून बाहेर निघणे अवघड जातं. समाज काय म्हणेल या भीतीपोटी पुरुष जगत असतो. यामुळे ज्याप्रमाणे महिलांच्या बाजूने कायदा आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या बाजूने असावा अशी आमची पत्नी पीडित संघटनेची मागणी आहे, असं पत्नी पीडित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले आहे.

'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहतायं? पाहा काय सांगतो कायदा, Video

गेल्या काही दिवसांपासून पुरुषांच्या तक्रारी वाढल्या

ज्याप्रमाणे महिलांच्या तक्रारी आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या ही तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुरुषांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आमच्याकडे आलेल्या प्रकरणांमध्ये आम्ही दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये अनेक प्रकरणांमध्ये आम्ही पती-पत्नीमध्ये समझोता करून दिला आहे, असं पोलिस निरीक्षक भरोसा सेल आम्रपाली तायडे यांनी सांगितले.

First published:

Tags: Aurangabad News, Local18