Home /News /maharashtra /

Aurangabad : अरे बापरे! भांडकुदळ बायको नको, म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी केली पिंपळाची पूजा, VIDEO

Aurangabad : अरे बापरे! भांडकुदळ बायको नको, म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी केली पिंपळाची पूजा, VIDEO

पत्नी

पत्नी पीडित पुरुष

परंपरेप्रमाणे वटपोर्णिमेला विवाहित स्त्रियांकडून वटवृक्षाची पूजा केली जाते. पण, औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुषांनी 'भांडकुदळ बायको नको रे बाबा', म्हणत चक्क पिंपळाची पूजा केली.

    औरंगाबाद, 14 जून : पत्नी पीडित पुरुष (Wife victim husband) आश्रम येथे सोमवारी (दि.13) रोजी सकाळी 10 वाजता पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी "वट पोर्णिमा साजरी करण्याने 7 जन्म एकच पती मिळत असेल, तर पिंपळ हा मुंजा आहे म्हणून आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पूजन करतो आणि मुन्जाला साकडे घालतो. "हे मुंजा आम्हाला अशा भांडखोर बायका देऊन मरण यातना देण्यापेक्षा कायमस्वरूपी मुंजा ठेव", अस साकडं पत्नी पीडित पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला घातलं. (Wife-afflicted men worship the Pimple tree) संघटनेचे प्रमुख भारत फुलारे म्हणतात की, "खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवल्या गेले. ते कायदे बनविताना पुरुष अबला होणार नाही, याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अबला झाला आहे. स्त्री-पुरुष समानता करता करता स्त्रीनेच केव्हा पुरुषांना गुलाम बनवले हे कळालेच नाही. भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश मानला जातो, त्यामध्ये आता स्त्रिया राज झाल्या आणि प्रधानाला गुलाम बवले. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटला परंतु ह्या एकतर्फी कायद्यामुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला आहे. त्यासाठी आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे." यावेळी, आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष वकील भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मणाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड, बनकर, नाटकर, कांबळे आदी पत्नी पीडित पुरूष उपस्थित होते. महिलांकडून होतोय कायद्याचा गैरवापर सद्या स्त्रियांनी कायद्याचा आधार घेत स्वतःची प्रगतीच केली नाही, तर पुरुषांना गुलाम बनवण्यासाठी त्या कायद्याचा गैरवापर करणे सुरू केला. एकतर्फी कायद्यामुळे महिलांना त्याचे संरक्षण मिळाले. परंतु, त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन पुरुषांवर अन्याय करणे सुरू केले आहे. परिणामी, विवाह पद्धतीवर होऊन विवाह बंधन हे एक पवित्र बंधन असताना त्याचे रूपांतर व्यवसायात होत चालले आहे. एकत्र कुटुंब पद्धत बुडाली असून विवाहवरचा युवकांचा विश्वास उडत जाऊन भारत पाश्चात्य संस्कृतीचे अवलंब करताना दिसत आहे, ही बाब अतिशय हानिकारक आहे. लग्न करणे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा केल्याप्रमाणे झाले आहे, इतर गुन्ह्यातून तरी सुटकेची शक्यता असते. परंतु लग्नाच्या गुन्ह्यातून पुरुष मेला तरी त्याच्या संपत्तीवर पत्नी दावा ठोकते, असे मत पिंपळाची पुजा करणाऱ्या पत्नी पीडित पुरूषांनी मांडले आहे. वाचा : लोकप्रिय अभिनेत्रीनं सोडली ठिपक्यांची रांगोळी मालिका, दुसऱ्या अभिनेत्रीनं घेतली लगेज तिची जागा! खरंतर परिस्थिती बदलली आहे, स्त्रियांच्या जाचाला पुरुषही कंटाळले आहेत. त्यातच अजून भर म्हणजे कोणी त्यांचं ऐकायला तयार नाही. अगदी कायद्यापुढे ही नतमस्तक झालेला पुरुष हा स्त्रियांच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी त्याच्या बाजूने कायदे करण्यासाठीची ही वेळ आलेली आहे. अबला झालेल्या पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविषयी आम्ही शासनाला वारंवार सांगतो आहे. परंतु, शासन आणि समाज पुरुषांवरदेखील अन्याय होते, स्वीकारायला तयार नाही, असेही मत संघटनेकडून मांडण्यात आले. अशी बायको 7 जन्मच नव्हे 7 सेकंदही देऊ नको शासनाने याचा स्वीकार करून पुरुषांच्या बाजुनेदेखील कायदे करावे, पुरुषांना देखील सन्मान पूर्वक वागणूक मिळावी, पुरुषांच्या संविधानिक अधिकारांवर गदा येऊ नये, पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, एकतर्फी कायदे संपवून लिंग भेद न करता कायदे तयार करावे, यासाठी अनेक आंदोलने केली. परंतु, सर्व काही निष्फळ ठरत चालल्याने अखेर आम्ही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला मुन्जाला साकडे घातले की, 'हे मुंजा, हे यमराजा, उद्या आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील. त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस. अशा बायकांच्या ताब्यात जाण्या पेक्षा तुझाच आधार चांगला. त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नको. अशा भांडखोर बायका आम्हाला 7 जन्म तर काय, पण 7 सेकंद देखील नको', असे म्हणून आज रोजी पत्नी पीडितांनी 'पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली.
    First published:

    पुढील बातम्या