मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad Special Report : शहरात पैसे खर्च करूनही मिळतं नाही पाणी, महिलांनी मांडलेल्या व्यथांचा पहा VIDEO

Aurangabad Special Report : शहरात पैसे खर्च करूनही मिळतं नाही पाणी, महिलांनी मांडलेल्या व्यथांचा पहा VIDEO

औरंगाबाद ही खरं तर स्मार्ट सिटी आहे. पण, शहरातील निसर्ग कॉलनी परिसरामधील महिलांना पैसे खर्च करूनही अनेक दिवसांपासून पाणी प्रश्नाला (Water Crisis in Nisarg colony Aurangabad city) सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासनाचे दुलर्क्ष होत आहे.

पुढे वाचा ...
  औरंगाबाद, 29 जून: गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही निसर्ग कॉलनी मध्ये राहतो. भविष्य इथंच घालवायचे असल्याने घर बांधले. मात्र, आलो तेव्हापासून या भागात पाण्याची मोठी अडचण आहे. पाण्याची पाईप लाईन टाकली मात्र ती मुख्य वाहिनिशी जोडली गेली नसल्याने नळाला अद्याप पाणी आले नाही. पाईप लाईन जोडण्यासाठी वेळ होत असल्याने महिलांना याचा मोठा त्रास होत आहे. महानगरपालिकेने (municipal corporation) आमचा पाण्याचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी कैफियत हेमलता बहूरे यांनी मांडली. (Water Crisis in Nisarg colony Aurangabad city) हे बोल ऐकून कदाचित तुम्हाला एखाद्या खेडेगावातील वातावरण असल्याचं वाटत असेल. मात्र, हा अंदाज चुकीचा आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद मधील निसर्ग कॉलनी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. पाण्याच्या पाइप लाईन टाकण्यात आल्या मात्र पाणी अद्याप पर्यंत नळाला आलेलं नाही पाणी समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पैसे भरून महापालिकेचे टँकर वेळेवर मिळत नाही. पावसाळ्यात कॉलनीत रस्ते चिखलाने तुडुंब भरले असल्याने आता कधी मधी मिळणारे पाणी मिळेल का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

  वाचा : 'मला माझ्याच लोकांनी धोका दिला', मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत भावूक

   महानगरपालिकेपासून काही किलोमीटर अंतरावरती भिमनगर भावसिंगपुरा ही वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 20 ते 30 हजार नागरिक रहिवासी आहेत. यात निसर्ग कॉलनी, लाल माती यासह वेगवेगळ्या कॉलनी व नगर तयार झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक राहिला आले आहेत. मात्र, येथील नागरिकांना पुरेसे सुविधा अद्याप पर्यंत उपलब्ध झालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर आहेस नागरिकांना वापरण्याला सुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर करावा अशी, मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या रोजगारावर परिणाम या ठिकाणी राहणारे बहुतांशी नागरिक हे मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. यामुळे त्यांना आज कमवायचं आणि आजच खायचं अशी त्यांची परिस्थिती आहे. असे असताना परिसरात पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना काम बुडवून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडतो तर आणि त्यांना नोकरी देखील गमवावी लागत आहे असे येथील नागरिक सांगतात. परिसरामध्ये नागरिकांना महानगरपालिकेतर्फे टँकर तर्फे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पाचशे रुपये प्रमाणे नागरिकांकडून आकारले जातात. हे पाचशे रुपये खर्च करून नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याचा येथील नागरिक सांगतात. अनेक वेळा टँकर कॉलनी मध्ये येण्यासाठी वाट बघावी लागते. यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. वाचा : ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता पाण्यासाठी आणखी प्रतिक्षाच राज्य सरकारने सतराशे कोटी रुपये खर्च करून शहरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निधी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून या कामाला सुरुवात झालेली आहे. यातून लवकरच पाणी मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र, अद्याप पर्यंत पाणी मिळाले नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या योजनेचे सुरू असलेला काम पाहता आणखी काही दिवस नागरिकांना पाण्यासाठी वाट बघावी लागेल अशीच परिस्थिती एकूण बघायला मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी औरंगाबाद महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यामुळे या प्रकरणी त्यांची बाजू समजू शकली नाही.
  First published:

  Tags: Aurangabad, Aurangabad News

  पुढील बातम्या