...म्हणे औरंगाबाद Smart City! शहरात 6-6 दिवस येत नाही पाणी, महिलांनी मांडलेल्या व्यथांचा पहा VIDEO
...म्हणे औरंगाबाद Smart City! शहरात 6-6 दिवस येत नाही पाणी, महिलांनी मांडलेल्या व्यथांचा पहा VIDEO
राज्यात आणि देशात औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटीच्या यादीत बराच वरचा क्रमांक लागतो. पण, शहरातील काही भागांमध्ये महिलांना कित्येक वर्षांपासून पाणी प्रश्नाला (Water Crisis in Aurangabad city) सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासनाचे दुलर्क्ष होत आहे.
औरंगाबाद, 10 जून : "गावखेड्यांमध्ये पाण्याचा खूप अडचणी असतात. यामुळे आपली मुलगी सुखात नांदावी, यासाठी औरंगाबादसारख्या स्मार्ट सिटीच्या (Smart City Aurangabad) शहरांमध्ये माझं लग्न लावून दिलं. आज माझ्या लग्नाला 15 वर्षं पूर्ण झालीत. लग्न झाल्यापासून आजपर्यंत आमच्या भागात पाणी टंचाई नेहमी जाणवते. डोक्यावर हंडे घेऊन पाणी वाहवं लागतं, त्यामुळे मानेच्या आजार सुरू झालेला आहे", अशी कैफियत कविता जेरीकर यांनी मांडली. (Water Crisis in Aurangabad city)
हे बोल ऐकून कदाचित तुम्हाला एखाद्या खेडेगावातील वातावरण असल्याचं वाटत असेल. मात्र, हा अंदाज चुकीचा आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरामध्ये मागील अनेक दिवसांपासून नागरिक पाण्याच्या टंचाईला सामोरे जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे.
वाचा :agriculture department : एक कॉल प्रोब्लेस सॉल्व्ह शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने केली ही उपाययोजना
मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहर पाणीटंचाईला सामोरे जात आहे. शहरापासून काही अंतरावर जायकवाडीचे मोठे धरण आहे. धरणामध्ये पाणीदेखील आहे. तरीही औरंगाबाद शहरातील नागरिक पाण्याच्या समस्येला सामोरे तोंड देत आहेत. नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत
'या' भागांत आहे पाण्याची टंचाई
शहरातील जय भवानी नगर, पुंडलिक नगर, मुकुंदवाडी, सातारा परिसर, बेगंपुरा, पडेगाव, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनी, टिव्ही सेंटर, यासह विविध भागांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. लोकांना पाण्यासाठी सहा-सहा दिवस वाट पहावी लागत आहे.
इतका आहे पाणीसाठी तरीही...
औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या धरणातील पाणी शहरात पाणी पुरवठ्यासाठी नियोजन केल्यास नागरिकांच्या समस्या सुटू शकेल. त्यासोबतच शहरापासून काही अंतरावर हर्सूल तलावात मोठा साठा आहे. या पाण्याचा वापर केल्यास काही भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.