मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pankaja Munde : PM चहा म्हणजे पंकजा मुंडे चहा, पंकजा मुंडेंनी टपरीवर बनवला चहा VIDEO ची जोरदार चर्चा

Pankaja Munde : PM चहा म्हणजे पंकजा मुंडे चहा, पंकजा मुंडेंनी टपरीवर बनवला चहा VIDEO ची जोरदार चर्चा

पंकजा मुंडे औरंगाबाद बीड रोडवर असलेल्या पिंपळगावात गेल्या होत्या, यावेळी त्यांनी चक्क कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये आपल्या सगळ्याच सहकार्यांना चहा करून दिला.

पंकजा मुंडे औरंगाबाद बीड रोडवर असलेल्या पिंपळगावात गेल्या होत्या, यावेळी त्यांनी चक्क कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये आपल्या सगळ्याच सहकार्यांना चहा करून दिला.

पंकजा मुंडे औरंगाबाद बीड रोडवर असलेल्या पिंपळगावात गेल्या होत्या, यावेळी त्यांनी चक्क कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये आपल्या सगळ्याच सहकार्यांना चहा करून दिला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

औरंगाबाद, 19 ऑक्टोबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. दसरा मेळावा झाल्यापासून त्यांनी दौरे करत कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत. संपर्क वाढवत आहेत. दरम्यान त्या औरंगाबाद बीड रोडवर असलेल्या पिंपळगावात गेल्या होत्या, यावेळी त्यांनी चक्क कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये आपल्या सगळ्याच सहकार्यांना चहा करून दिला. चहा तयार बनवल्यानंतर पंकजाताई स्वतः त्यांनी पातेल्यातील चहा ओतत कार्यकर्त्यांना कपात ओतून दिला. दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे दसरा मेळाव्यानंतर आक्रमक झाल्याचे पहायला दिसत आहे.

पंकजा मुंडे भाजपमध्ये होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळी मात्र पंकजा मुंडे वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. औरंगाबाद बीड रोडवरून जात असताना त्यांना चहाची तलप लागल्याने रस्त्यात ताफा थांबवून स्वतः एका हॉटेलमध्ये चहा बनवला. विशेष म्हणजे या चहाला त्यांनी PM चहा म्हणजेच पंकजा मुंडेंचा चहा असे नाव देखील दिले. तर यावेळी त्यांनी स्वतः बनवलेली चहा आपल्या सहकाऱ्यांना देखील पाजला. त्यामुळे सद्या पंकजा यांच्या पीएम चहाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा : पुणे तुंबले, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली, मोहोळ यांचे अजितदादांनाच 7 सवाल

पंकजा मुंडे ह्या कार्यकर्त्यांसह औरंगाबाद-बीड प्रवास करत असताना थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी म्हणून त्यांनी चहासाठी आपला ताफा थांबवला. यावेळी पंकजा यांना चहा प्यायचा असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल चालक दिनेश शिंदे यांना चहाची ऑर्डर दिली. पण त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी आपण स्वतः चहा बनवणार असल्याचे सांगत, थेट हॉटेलमधील किचन गाठलं. दिनेश यांच्याकडून दुध,चहा पावडर घेत पंकजा मुंडे यांनी स्वतः चहा बनवला. त्यानंतर त्यांनी सर्व सहकाऱ्यांसोबत चहाचा आनंद घेतला. 

यावर बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला चहा बनवून बरीच दिवस झाली आहे. मी स्वयंपाक उत्तम करते, मात्र चहा सहसा मी बनवत नाही. त्यामुळे आज खूप दिवसांनी मी चहा बनवला आहे. मी येथे मिसळ खाण्यासाठी आली होते. पण याठिकाणी आल्यावर गॅस आणि शेगडी पाहून मला चहा बनवण्याचा मोहच आवरला नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना चहा बनवून पाजण्याचं मी ठरवलं आणि त्यानुसार हा चहा बनवला असल्याचं पंकजा मुंडे माध्यमांना माहिती दिली.

हे ही वाचा : भाजपला धक्का, शाहू घराण्यातील युवराज शिवबंधनात अडकणार!

दरम्यान चहा घेत  पंकजा मुंडे यांनी  माध्यमांशी चर्चा केली, यावेळी त्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. याचबरोबर त्यांनी आपल्या वडिलांचा म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळाही दिला. राजकारण कसे असते, त्यामध्ये सर्वच गोष्टीचे मिश्रण असते. जसं चहामध्ये पत्ती, साखर व्यवस्थितपणे पडली पाहिजे, थोडसं इलायची वैगरे सर्व व्यवस्थित टाकल्यावर चहा चांगला बनतो. तर मला जरा स्ट्रॉंग चहा आवडतो असा खोचक टोलाही पंकजा मुंडे यांनी यावेळी लगावला.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Beed, Beed news, Pankaja munde