गंगापूर, 27 जुलै : आजारी मुलाला दुचाकीवरून घेऊन जाताना दुचाकी चिखल्यात रुतल्याने चिमुकल्याने दुचाकी वरच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सत्ता संघर्षामध्ये मविआ सरकारने जातात औरंगाबादचे संभाजीनगर (sambhajinagar) असे नामकरण केले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे आणि भाजप सरकारनेही आधीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊन छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले. पण नामकरण झाले असले तरी शहरवासियांच्या समस्या तशाच आहे. औरंगाबादमध्ये रस्ताच नसल्यामुळे एका चिमुरड्याचा हकनाक बळी गेला आहे.
गंगापूर तालुक्यातील लखिंपुर येथे राहणाऱ्या 8 वर्षीय कृष्णा परदेशी याच्या पोटात दुखू लागल्याने त्याचे वडील बाबूलाल परदेशी त्याला दुचाकीवरून गंगापूर येथे घेऊन जात होते. मात्र, जाताना खराब रस्त्यावर चिखल झाल्यामुळे दुचाकी त्यात फसली. तासभर अथक परिश्रम करून देखील मोटरसायकल चिखलातून काही केल्या निघत नव्हती.
(सिद्धू मुसेवालानंतर आणखी एका प्रसिद्ध पंजाबी गायकाचं निधन; संगीतसृष्टीवर शोककळा)
अखेर उपचाराअभावी दुर्दैवाने त्यांच्या मुलाने त्यांच्या डोळ्यासमोर प्राण सोडले. या घटनेनंतर संपूर्ण गावात यंत्रणा राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
(आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र)
लोकशाहीतील लज्जास्पद घटना, राज्यकर्त्यांनो लाज वाटू द्या, स्वतःचे लेकरू जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचं दुःख काय असतं अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून सोशल मीडियावर उमटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.