अविनाश कानडजे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 27 नोव्हेंबर : औरंगाबादमधील लासूर स्टेशनवर रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना थोडक्यात टळला आहे. तांत्रिक बिघाड की अधिकाऱ्याच्या चुकीमुळे एकाच वेळी दोन्ही रेल्वे एकाच प्लॅटफार्मवर आल्या होत्या. पण, मोटारमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनवर हा प्रकार घडला. लासूर स्टेशनवर इलेक्ट्रिक लाईनचे काम करणारे अभियंता आणि कर्मचारी हे डेमो गाडी येण्याची वेळ झाल्यामुळे मार्ग मोकळा करून देत होते. त्यावेळी स्पेशल असलेली रेल्वे गाडी लासूर रेल्वे स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर उभा केली होती.
(...म्हणे प्रेमात अडसर, प्रियकराच्या मदतीने मामाच्याच मुलीचा केला गेम; बीड हादरलं!)
याच दरम्यान नगरसोल ते जालना डेमो गाडी नंबर ०७४९२ या गाडीस दोन नंबर प्लॅटफॉर्म येण्यास सिग्नल दिले होते. पण अचानक वीज पुरवठ्याचा दाब वाढल्याने सिग्नल सिस्टम ड्रिप झाल्याने सिग्नल बंद पडले.
(औरंगाबाद : नात्याला काळीमा, मामाकडून 22 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार)
डेमो गाडी एक नंबर प्लॅटफॉर्मवर वळाली पण समोर गाडी उभा असल्याचे लक्षात आले, त्यानंतर लगेच डेमोच्या मोटारमनने सावधगिरी बाळगत डेमो थांबवली. समोर उभा असलेल्या चालकाने देखील इंजिनचा लाईट चालू बंद करत इशारा देण्यास सुरूवात केली होती. दोन्ही चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पण, अचानक झालेल्या या घटनेमध्ये चूक कुणाची होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नांदेड आणि सिंकदराबाद इथं चौकशीला बोलवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news