औरंगाबाद, 23 जानेवारी : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या पाचपीरवाडी गावात चोरट्यांनी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. मात्र मंदिरात चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी जे केले ते पाहून विश्वास बसणार नाही.
हा सर्व प्रकास मंदिरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांनी दानपेटीतील पैसे चोरण्यापूर्वी देवाचं दर्शन घेतलं. देवाला फूलं वाहिली आणि नंतर चोरी केली. या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या पाचपीरवाडी गावात चोरट्यांनी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. मात्र मंदिरात चोरी करण्यापूर्वी या चोरट्यांनी जे केले ते पाहून विश्वास बसणार नाही. pic.twitter.com/Kru1Oo3AFD
— News18Lokmat (@News18lokmat) January 25, 2023
घटना सीसीटीव्हीत कैद
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यात असलेल्या पाचपीरवाडी गावात टेकडी महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी सर्वात आधी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी महादेवाच्या पिंडीवर फुलं वाहिली. महादेवाला नमस्कार केला. नंतर महादेवासमोर ठेवलेल्या दानपेटीवरच डल्ला मारला.
हा सर्व प्रकास मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad