मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : रेल्वे स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांना त्रास, पर्यटनाच्या राजधानीत सुविधांकडे दुर्लक्ष

Aurangabad : रेल्वे स्टेशनवर ज्येष्ठ नागरिकांना त्रास, पर्यटनाच्या राजधानीत सुविधांकडे दुर्लक्ष

औरंगाबाद रेल्वे स्टेशन वरील सरकते जिने काही दिवसांपासून बंद आहेत.

औरंगाबाद रेल्वे स्टेशन वरील सरकते जिने काही दिवसांपासून बंद आहेत.

औरंगाबाद रेल्वे स्टेशन वरील सरकते जिने काही दिवसांपासून बंद आहेत.

औरंगाबाद, 22 सप्टेंबर : औरंगाबाद रेल्वे स्टेशन मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाते. मात्र, या ठिकाणी असलेले सरकते जिने काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना जिने चढताना कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरीक तसेच लहान मुलांना गाडी आल्यावर प्लॉटफॉर्मवर येतांना किंवा जातांना हे सरकते जिने चालू असणे आवश्क असते. परुंतु हे जीने बंद असल्यामुळे प्रवासी नागरिकांची गैरसोय होत आहे. औरंगाबाद शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी विविध ऐतिहासिक वस्तू व वारसा स्थळ असल्यामुळे जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक व नागरिक या ठिकाणी रेल्वेने येत असतात. मात्र, औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानकावरती प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेले सरकते जीने गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे इथून प्रवास करणारे प्रवासी व पर्यटक रेल्वे स्थानकाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत असून सरकते जिने सुरु करण्याची मागणी करत आहेत. हेही वाचा : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने केली आत्महत्या, औरंगाबाद हादरलं  ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकते जिने सुरु करावे  आम्ही परभणी येथून औरंगाबाद येथे आलो आहोत. घरातील मुलांनी आम्हाला बसून दिलं. मात्र, या ठिकाणी आमच्या सोबत कोणीच नव्हतं सोबत बॅग होत्या असं असलं तरी येथील सरकते जिने बंद असल्यामुळे आम्हाला बॅग घेऊन पायी चालत जावं लागतंय . रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकते जिने सुरु करावे अशी आमची मागणी आहे, असं ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव जाधव सांगतात. आम्हाला कुटुंबीयांसोबत मुंबईला जायचं आहे. आमच्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना चालण्याचा त्रास होतो. मात्र, या ठिकाणी त्यांच्यासाठी असलेले सरकते जिने बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय झाली आहे, असं प्रवासी अस्लम शेख सांगतात. दरम्यान , सरकते जिने बंद असल्याप्रकरणी प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी आम्ही स्टेशन प्रबंधक एल.के. जाखडे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, काही नागरिक सरकता जिन्यावरून चालताना खोडसाळपणा करत असतात. त्यामुळे ही सरकते जिने बंद करण्यात आले होते. मात्र, लवकरच सुरू करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या