Home /News /maharashtra /

गावावरून भेटायला आले अन् घरातून येत होती दुर्गंधी, दार उघडले तर बसला धक्का, औरंगाबादेतील घटना

गावावरून भेटायला आले अन् घरातून येत होती दुर्गंधी, दार उघडले तर बसला धक्का, औरंगाबादेतील घटना

 
सदर महिलेचा भाऊ,चुलत भाऊ आणि गेवराई बार्शी येथील सरपंच हे सावता नगर येथील भगुरे यांच्या घरी आले असता घराला कुलुप होते.

सदर महिलेचा भाऊ,चुलत भाऊ आणि गेवराई बार्शी येथील सरपंच हे सावता नगर येथील भगुरे यांच्या घरी आले असता घराला कुलुप होते.

सदर महिलेचा भाऊ,चुलत भाऊ आणि गेवराई बार्शी येथील सरपंच हे सावता नगर येथील भगुरे यांच्या घरी आले असता घराला कुलुप होते.

  अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 05 जुलै : औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे.  पैठण (paithan) तालुक्यातील बिडकीनमध्ये एका बंद खोलीमध्ये 38 वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह (dead body) आढळून मिळाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेचा पती या घटनेनंतर फरार असल्यामुळे पोलिसांना संशय बळावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकिन येथील सावता नगर परिसरात रात्री किरायाणे राहणाऱ्या कुटुंबातील ३८ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  राधा अशोक भगुरे असं मृत महिलेचं नाव आहे. भगुरे या मुळच्या गेवराई येथील आहे. सदर महिलेचा भाऊ,चुलत भाऊ आणि गेवराई बार्शी येथील सरपंच हे  सावता नगर येथील भगुरे यांच्या घरी आले असता घराला कुलुप होती आणि घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी बिडकिन पोलिसांना कळवले. (पावसाच्या धास्तीने प्रसाशन सज्ज, राज्यात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा alert) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. तेव्हा या महिलेला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

  Income Tax: आयकर भरताना ही माहिती लपवता येणार नाही; चेक करा डिटेल्स

  भगुरे कुंटुब मागील सात ते आठ वर्षांपासून बिडकीन येथे राहत असून, जवळच दाल मिलचा गृहउद्योग ही करत होते. दरम्यान, या महिलेला एक अल्पवयीन मुलगा आणि एक मुलगी असून हे दोघेही मागील काही दिवसांपासून पती अशोक भगुरे याच्या भावाकडे गेले होते. अशोक भगुरे हे मात्र फरार आहे. या घटनेची बिडकीन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही हत्या की आत्महत्या या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष जाधव हे करित आहेत.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Maharashtra News

  पुढील बातम्या