मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस कसा होता? पाहा 74 वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव Video

मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस कसा होता? पाहा 74 वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव Video

'भारतीय लष्कराच्या ताब्यात औरंगाबाद देण्यास रझाकारांचा विरोध होता. 17 सप्टेंबर 1948 पूर्वीची रात्र आम्ही तणावातच काढली.'

'भारतीय लष्कराच्या ताब्यात औरंगाबाद देण्यास रझाकारांचा विरोध होता. 17 सप्टेंबर 1948 पूर्वीची रात्र आम्ही तणावातच काढली.'

'भारतीय लष्कराच्या ताब्यात औरंगाबाद देण्यास रझाकारांचा विरोध होता. 17 सप्टेंबर 1948 पूर्वीची रात्र आम्ही तणावातच काढली.'

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : मराठावाड्याला स्वातंत्र्य मिळून आज (शनिवार, 17 सप्टेंबर) 74 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरानी मराठवाडा स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आता सुरूवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील नागरिक या लढ्यात सहभागी झाले होते. आजही त्या चळवळीच्या आठवणींना स्वातंत्र्य सैनिक उजाळा देतात. औरंगाबादच्या ताराबाई लड्डा देखील स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या होत्या. निजामाच्या विरोधात काढलेल्या प्रभात फेरीत सहभागी होणे. स्वातंत्र्य सैनिकांना पत्र पोहचवणे ही काम तेंव्हा लहान असलेल्या ताराबाई करत असतं.  भारत सरकारनं केलेल्या लष्करी कारवाईनंतर निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याची मुक्तता झाली. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ती 74 वर्षांपूर्वीची सकाळ आजही ताराबाईंना आठवते. त्यांनी Local 18 शी बोलताना त्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या आहेत. 'त्या' दिवशी काय घडलं? '17 सप्टेंबरपूर्वी भारतीय लष्कर औरंगाबादच्या सीमेवर दाखल झाले होते. त्यांनी शहर ताब्यात देण्याचं आवाहन निझामाच्या सैन्याला (रझाकार) केलं. भारत सरकारच्या त्या आवाहनाला रझाकारांचा त्याला विरोध होता. त्यामुळे आता काय होणार हा तणाव आमच्या सर्वांच्या मनात होता. 17 सप्टेंबरपूर्वीची ती रात्र मी कधीही विसरणार नाही.' भारतीय सैन्य आदल्या दिवशी दौलाताबादपर्यंत आले होते. आता औरंगाबादमध्ये काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. आम्ही देखील घाबरलो होतो. रझाकारांच्या भीतीनं शेजारच्या कुटुंबात आश्रय घ्यावा का यावर आमच्या घरी चर्चा झाली. काय होईल ते होईल, आपण घरामध्येच थांबू असा निर्णय घरातील वडिलधारी मंडळींनी घेतला.' अशी आठवण ताराबाईंनी सांगितली आहे. मराठवाडा मुक्ती दिन : रझाकार कधीही दार वाजवत... 'वीर' पत्नीनं सांगितला थरारक अनुभव Video तिसऱ्या क्रमांकाच्या खोलीत गेलो कारण... ताराबाई यांच्या कुटुंबाने ती रात्र तिसऱ्या क्रमांकाच्या खोलीत घालवली यामागे देखील एक खास कारण होते. 'घरात कोणी आलं (रझाकार) तर ते आधी पहिलं आणि नंतर दुसरं दार तोडतील. ते ही दार तोडपर्यंत आपल्याला वेळ मिळेल.' असा त्या काळातील भीतीचं वर्णन करणारा अनुभव ताराबाई यांनी सांगितला. 17 सप्टेंबरला सकाळी आमच्या घरी दूधवाला आला. त्यानं दूध देण्यासाठी दार ठोठावलं. त्यावेळी आम्ही प्रचंड घाबरलो होतो. अखेर त्याने ओरडून स्वत:ची ओळख सांगितल्यानंतर आम्हाला हायसं वाटलं. सैन्य शहरात दाखल झाल्याची आनंदाची बातमी त्यांनी आम्हाला सांगितली. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. मराठवाडा स्वतंत्र झाला. भारतामध्ये सामील झाला याचा सर्वांना आनंद झाला होता. गुलमंडीमध्ये पहिल्यांदा राष्ट्रगीत म्हंटलं गेलं. त्याच ठिकाणी मिठाईचं वाटपही करण्यात आलं.' अशी 17 सप्टेंबरची आठवण ताराबाई यांनी सांगितली आहे.
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या