छत्रपती संभाजीनगर, 7 मार्च, अविनाश कानडजे : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि कारच्या या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
अपघातामध्ये तिघांचा मृत्यू
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारणे समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. यात पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दोन जण जखमी
कारने ट्रकला पाठिमागून धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पती-पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाला आहे. अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर त्यांच्या मुलाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये अख्ख कुटुंबचं संपल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident