मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अतिविश्वास नडला, औरंगाबादमधील दोघांनी लेन्सकार्ट कंपनीला लावला 93 लाखांचा चुना, चलाखी पाहून पोलीसही हैराण

अतिविश्वास नडला, औरंगाबादमधील दोघांनी लेन्सकार्ट कंपनीला लावला 93 लाखांचा चुना, चलाखी पाहून पोलीसही हैराण

Crime in Aurangabad: औरंगाबाद येथील एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये काम करणाऱ्या दोन जणांनी कंपनीला तब्बल 93 लाखांचा गंडा (93 lakh fraud in lenskart store) घातला आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 21 डिसेंबर: औरंगाबाद (Aurngabad) येथील एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये काम करणाऱ्या दोन जणांनी कंपनीला तब्बल 93 लाखांचा गंडा घातला (93 lakh fraud in lenskart store)आहे. संबंधित कंपनीच्या स्टोअरमधून ग्राहकांनी खरेदी केल्यानंतर, मिळालेले पैसे आरोपींनी स्वत:च्या अकाउंटवर वळते केले आहेत. अशाच पद्धतीने आरोपींनी गेल्या काही दिवसांत कंपनीला तब्बल 93 लाखांचा चुना लावला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी औरंगाबादच्या सायबर पोलिसांनी एकाला अटक (1 accused arrested) केली आहे. मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील सिडको परिसरातील रहिवासी असणारे शिरीषकुमार प्रतापराव पगारे यांनी काही महिन्यांपूर्वी  लेन्सकार्ट कंपनीचे गॉगल्स आणि चष्मे विकण्यासाठी फ्रेंचायझी घेतली होती. पगारे यांनी या लेन्सकार्ट स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून मयूर देशमुख तर सेल्समन म्हणून दामोदर वामन गवई याला कामावर ठेवले होते. लेन्सकार्ट स्टोअरमध्ये ग्राहकांनी खरेदी केल्यास त्याचं पेमेंट करण्यासाठी आरोपी कंपनीच्या बँक खात्याचा नंबर देण्याऐवजी स्वत:च्या खात्याचा क्यूआर कोड स्कॅन करायला देत होते.

हेही वाचा-Buldhana: संपत्ती हडपण्यासाठी आईलाच दाखवलं मयत; तरुणाचा कांड वाचून व्हाल हैराण

अशा पद्धतीने आरोपींनी गेल्या काही काळात कंपनीचे तब्बल 93 लाख रुपये लुबाडले आहेत. दरम्यान 10 नोव्हेंबर रोजी लेन्सकार्ट कंपनीच्या एरिया मॅनेजरने स्टोअर मालक पगारे यांना फोन करून ग्राहकांना विक्री केलेल्या सामानाच्या कार्ड पेमेंटची काही रक्कम कंपनीकडे जमा झाली नसल्याचं सांगितले. पगारे हे स्वत: ओमानमध्ये असल्याने त्यांनी भाऊ सुशील याला नेमकं काय झालं याची चौकशी करण्यास सांगितलं. त्यांनी मॅनेजर आणि सेल्समनकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा-टोमॅटोच्या वाहतुकीच्या नावाने दारुचा धंदा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

या प्रकारानंतर पगारे यांनी लेन्सकार्ट स्टोअरचा मॅनेजर आणि सेल्समन विरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी तक्रार दाखल होताच औरंगाबादच्या सायबर पोलिसांनी सेल्समन दामोदर गवई याला अटक केली आहे. पण मुख्य आरोपी मॅनेजर मयूर देशमुख हा फरार झाला आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Money fraud