अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर), 28 फेब्रुवारी : मागच्या दिड वर्षापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. दरम्यान या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस सुविधा सरकारने दिल्या होत्या. दरम्यान या काळात नवीन नियुक्त्या झालेल्या महिला एसटी चालकांचे प्रशिक्षण रखडले होते. ते आता पूर्ण झाल्याची माहिती समोर आले आहे.
कोरोना महामारी आणि त्यानंतर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महिला चालक वाहकांचे लांबलेले प्रशिक्षण आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. सध्या 80 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू असून, हे मार्च अखेर पर्यंत संपणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
1-2 नव्हे तब्बल 652 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; मुंबई महापालिकेत 12वी पाससाठी मोठ्या भरतीची घोषणा
यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून 32 महिलांच्या हाती एसटीचे स्टेरिंग देण्यात येणार आहे, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांचे 80 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू असून, यानंतर पुणे येथे अंतिम टेस्ट घेतली जाणार आहे.
पुन्हा एसटी कर्मचारी आंदोलन करण्याच्या तयारीत
2019 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी देणे, एसटी महामंडळात वर्षानुवर्षे काम करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळते त्यामध्ये वाढ करणे, एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रता बघून नोकरीत पाच टक्के आरक्षण द्यावे, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवासाचा पास द्यावा यांसारख्या इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.
मागण्या मान्य होई पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. निश्चितच आता हे आंदोलन नेमकं काय स्वरूप घेत यावर शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एका वर्षात एकदाच करता येणार अर्ज
महाविकास आघाडी काळात 6 महिने आंदोलन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणीसहित वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तसेच इतर काही तत्सम मागण्यासाठी हा संप त्यावेळी पुकारला होता. हा संप एसटी महामंडळाला देखील मोडीत काढता आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: St bus