Home /News /maharashtra /

औरंगाबादमधील शाळेचा नाद खुळा! 100 गुण घेणाऱ्या मुलींची थेट शाळेतूनच काढली बँड, बाजा, बरात!

औरंगाबादमधील शाळेचा नाद खुळा! 100 गुण घेणाऱ्या मुलींची थेट शाळेतूनच काढली बँड, बाजा, बरात!

आज जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत (SSC class 10 result) औरंगाबाद शहरातील सिडको एन टू मधील ज्ञानेश विद्यालयातील दोन मुलींनी 100 पैकी 100 गुण मिळवले. या यशाबद्दल शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी दोघींची रथांमधून मिरवणूक काढली

पुढे वाचा ...
  औरंगाबाद, 17 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC class 10 result) आज जाहीर झाला. या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे 12 वीप्रमाणे दहावीतील परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. औरंगाबाद शहरातील अशाच विद्यार्थ्यांचा वेगळा कौतुक सोहळा शहरवासीयांना पाहायला मिळाला आहे. ज्ञानेश विद्यालयातील दोन मुलींची बाजी आज जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद शहरातील सिडको एन टू मधील ज्ञानेश विद्यालयातील दोन मुलींनी 100 पैकी 100 गुण मिळवले. या यशाबद्दल शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी दोघींची रथांमधून मिरवणूक काढली. ज्ञानेश्वर विद्यालयातील स्नेहल सूर्यवंशी आणि करिष्मा राज्यभर या दोघींनी शंभर पैकी शंभर मार्क मिळवले आहे. शाळेतील विद्यार्थी ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांकडून आदर्श घ्यावा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि गुणवंत विद्यार्थ्यांना भविष्यात प्रोत्साहन मिळावे यासाठी ही रथयात्रा काढली. गेल्या वर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दहावीचा निकाल हा विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला होता. यामध्ये नववी आणि दहावीचे गुण देण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे बोर्डाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याला अनेक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विरोधही केला. मात्र, परीक्षा ऑफलाईनच घेण्यात आल्या. या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींना चांगले गुण प्राप्त केले आहेत. राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

  Pune : 'सूर्यदत्त'ची शिष्यवृत्ती घ्या! नोकरदारांसहीत विद्यार्थ्यांना 'लाइफलाॅंग लर्निंग' अतंर्गत मिळणार 75 लाखांची शिष्यवृत्ती

  स्पेशल निकालाची वैशिष्ट्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40% लागला आहे. एकूण 66 विषयांना सुधारित मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे. राज्यातील शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शाळांचा निकाल 100 % लागला आहे. सन 2022 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2021 च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 54,303 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 79.06% आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Exam result, Ssc board

  पुढील बातम्या