Home /News /maharashtra /

Video: नाग-मुंगुसाचं भांडण पोहचलं थेट औरंगाबाद-वैजापूर महामार्गावर; असा झाला थरारक शेवट

Video: नाग-मुंगुसाचं भांडण पोहचलं थेट औरंगाबाद-वैजापूर महामार्गावर; असा झाला थरारक शेवट

वैजापूर तालुक्यातील गारजजवळील औरंगाबाद-वैजापूर महामार्गावर मुंगूस आणि सापाचे भांडण बघायला मिळाले. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.

    औरंगाबाद, 04 ऑगस्ट : मुंगूस आणि सापाचे सात जन्माचे वैर आहे, असे आपण नेहमी ऐकत आलोय. साप-नाग कितीही मोठा असला तरी त्याच्यावर चाल करून जाणारं मुंगूस अनेकांनी पाहिलंय. आज वैजापूर तालुक्यातील गारजजवळील औरंगाबाद-वैजापूर महामार्गावर मुंगूस आणि सापाचे भांडण बघायला मिळाले. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. मुंगूस आणि सापाचं हाड वैर सर्वांनाच परिचित आहे, अशीच घटना आज औरंगाबाद महामार्गावरील गारज येथे एका शेताजवळ बघायला मिळाली. नाग रस्ता ओलांडत असताना मुंगसाने त्याचा पाठलाग करून त्याला महामार्गावरच अडवले. मुंगूस आणि नागाचे भांडण आणि ते पाहायला लोकांची गर्दी जमल्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली. मुख्य रस्त्यावरच मुंगस आणि सापाचे भांडण सुरू असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. हे भांडण अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं. हे वाचा -  शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली रस्त्यावर नाग फणा काढून उभा असताना मुंगसाने मागून येऊन त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. या झटापटीत मुंगूस पहिल्यापासूनच वरचढ दिसत होता. नागही बचावासाठी निकराचे प्रयत्न करत होता,  या भांडणात अखेर मुंगुसाने एका पाठोपाठ एक हल्ले करून अखेर सापाला ठार केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad News, Snake video

    पुढील बातम्या