सुशील राऊत, प्रतिनिधी
औरंगाबाद, 9 फेब्रुवारी : अनेकदा उपवास असो किंवा नसो साबुदाण्यापासून तयार पदार्थ खायला आवडतात. उपवासाला तर पोट भरुन साबुदाणा खिचडीचे सेवन केले जात असते. खिचडीशिवायही प्रामुख्याने साबुदाणा वडे सुद्धा दह्यासोबत खाल्ले जात असतात. औरंगाबाद शहरातील औरंगपुरा भागातील श्री गणेश साबुदाणा वडा स्टॉल हा साबुदाणा वड्यासाठी प्रसिद्ध आहे. 40 वर्षांपासून या ठिकाणी मिळणाऱ्या साबुदाणा वड्याची चव आजही कायम आहे. यामुळे या ठिकाणी ग्राहकांची गर्दी दररोज पाहिला मिळते.
कधी झाली सुरुवात?
रमेश लहरे यांनी 40 वर्षांपूर्वी औरंगपुरा येथे श्री गणेश साबुदाणा वडा नावाने स्टॉल सुरू केला. सुरुवातीला तीन रुपये प्लेट प्रमाणे साबुदाणा विक्री करायला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. मात्र, ग्राहकांना रमेश लहरे यांच्या स्टॉलच्या साबुदाणा वड्याची चव चाखायला मिळाली त्यानंतर त्यांच्या स्टॉलला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
साबुदाणा वडा बनवण्यासाठी काय लागत?
साबुदाणा, शेंगदाणे, तेल, मीठ, लवंगी, मिरची, दही इत्यादी पदार्थ लागतात.
साबुदाणा वड्याची किंमत काय?
साबुदाणा वडा: 60
सिंगापूरी साबुदाणा वडा: 80
कोल्हापुरी साबुदाणा वडा: 80
ग्राहकांची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न
आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. महागाई वाढली असली तरी ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही दर्जेदार साहित्य वापरून चव कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. भविष्यातही ग्राहकांची सेवा करत राहू, असं मालक रमेश लहरे यांनी सांगितले.
काळ्या मसाल्याचे 'सम्राट', 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Video
मी औरंगाबाद शहरातील मोढा नाका या ठिकाणी जॉब करतो. मला साबुदाणा वडा प्रचंड आवडतो. यामुळे माझी इच्छा झाल्यानंतर मी औरंगपुरा येथील या स्टॉलवर साबुदाणा वडा खाण्यासाठी येत असतो, असं ग्राहक प्रतिक काकडे सांगतात.
पत्ता
औरंगपुरा येथे असलेल्या आंबा अप्सरा टॉकीज समोर जिल्हा परिषद कार्यालय समोर श्री गणेश साबुदाणा वडा सेंटर आहे.
संपर्क - 070284 03947
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local Food, Local18, Local18 food