Home /News /maharashtra /

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा Live Video समोर

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा Live Video समोर

औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

    औरंगाबाद, 6 जुलै : औरंगाबादमधून (Aurangabad) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. संजय शिरसाट आज विमानतळावरुन शक्ती प्रदर्शन करत त्यांच्या मतदारसंघात जात होते. यावेळी त्यांच्याच ताफ्यातील केंद्रीय सुरक्षाचे जवान घेऊन जाणाऱ्या गाडीनेच त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय शिरसाट बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. पण या अपघातानंतर आमदार संजय शिरसाट यांचा पारा चांगलाच चढलेला दिसला. या अपघातातून आमदार संजय शिरसाट सुरक्षित आहेत. पण त्यांच्या लक्झरी गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. संबंधित अपघाताची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. ते व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 10 जूनला निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर याच दिवशी रात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतला रवाना झाले. त्यानंतर तिथून ते गुवाहाटीला गेले. तिथे काही दिवस मुक्काम केल्यानंतर गोवा आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईत आले. या आमदारांमध्ये संजय शिरसाट यांचा देखील समावेश होता. (...म्हणून Dr. Gurpreet Kaur शी पन्नाशीतही करत आहेत लग्न; CM Bhagwant Mann यांच्या दुसऱ्या लग्नाचं कारण समोर) संजय शिरसाट हे आज जवळपास 15 दिवसांनी आपल्या मतदारसंघात गेले. ते मुबंईहून औरंगाबाद विमानाने प्रवास करुन गेले. तिथून ते 100 गाड्यांच्या ताफ्यासह आपल्या मतदारसंघात गेले. यावेळी त्यांच्याकडून प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. त्यांनी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील वंदन केलं. या शक्ती प्रदर्शनादरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या