मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आश्चर्यकारक! शिवसेनेकडून आधी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी आणि आज थेट भाजपच्या बड्या नेत्याची भेट

आश्चर्यकारक! शिवसेनेकडून आधी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी आणि आज थेट भाजपच्या बड्या नेत्याची भेट

अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो

अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात गेल्या दीड महिन्यात अनेक घडामोडी घडताना आपण पाहिलं

औरंगाबाद, 10 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच भरोसा नाही. राज्याच्या राजकारणात गेल्या दीड महिन्यात अनेक घडामोडी घडताना आपण पाहिलं. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे, असं मानलं जात होतं. पण याच शिवसेनेत गेल्या महिन्यात मोठी फूट पडली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षाला मोठं खिंडार पाडलं. त्यांच्यासोबत सेनेचे 40 आमदार गेले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेचे अनेक दिग्गज आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंना पाठिंबा दिला. पण या काळात काही नेते ठाकरेंच्या पाठिमागे खमकेपणाने उभे राहिले. मराठवाड्यातील नेते अंबादास दानवे हे त्यांच्यापैकीच एक. त्यांच्या निष्ठेची दखल घेत उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठी संधी आणि जबाबदारी दिली. पण ठाकरेंनी दानवेंवर मोठी जबाबदारी दिल्यानंतर आज एक अनपेक्षित घटना बघायला मिळाली. औरंगाबादमध्ये एक वेगळीच आणि अनपेक्षित राजकीय भेट बघायला मिळाली. औरंगाबादमध्ये राजकीय शत्रुत्व बाजूला ठेऊन अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेतली. औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात ही भेट आश्चर्यकारक आहे. अंबादास दानवे म्हणाले बागडे नाना माझ्यासाठी कुण्या एका पक्षाचे नाहीत तर औरंगाबादचे जेष्ठ नेते आहेत. यावेळी अंबादास दानवे यांनी सुद्धा अंबादास दानवे यांना पेढा भरवून चांगले काम करण्याचा सल्ला दिला. (शिंदे-ठाकरे वादाला नवी तारीख, सुप्रीम कोर्टाची सुनावणी 10 दिवसांनी लांबली!) राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग राज्यात नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात देखील हालचालींना वेग आल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीत राज्य सरकारला पुढच्या काही दिवसांमध्ये कसं घेरायचं याबाबत रणनीती होण्याची शक्यता आहे. याशिवाय विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे यांची निवड केल्याने काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Shiv sena, Uddhav thackeray

पुढील बातम्या