Home /News /maharashtra /

Aurangabad : औरंगाबादचे खेळाडू निघाले लंडनला; तलवारबाजीत देशाची मान उंचावणार, VIDEO

Aurangabad : औरंगाबादचे खेळाडू निघाले लंडनला; तलवारबाजीत देशाची मान उंचावणार, VIDEO

title=

लंडन येथे होणाऱ्या कॅडेट ज्युनिअर आणि सीनिअर गटातील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेसाठी ( Commonwealth Fencing Championships ) औरंगाबाद येथील दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड ( Selection in Indian team ) करण्यात आली आहे.

    औरंगाबाद, 29 जुलै : लंडन येथे होणाऱ्या कॅडेट ज्युनिअर आणि सीनिअर गटातील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेसाठी ( Commonwealth Fencing Championships ) औरंगाबाद येथील दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड ( Selection in Indian team ) करण्यात आली आहे. यामुळे औरंगाबाद येथील दोन खेळाडू ( Two players from Aurangabad ) लंडन येथे आयोजित राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत मैदान गाजवणार आहेत. लंडन मध्ये या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेचे 9 ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संघात औरंगाबाद येथील खेळाडू कशीष भराड आणि श्रेयस जाधव यांची निवड करण्यात आली आहे. कटक येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी तलवारबाजी स्पर्धेत कशीष भराड आणि श्रेयस जाधव यांनी चमकदार कामगिरी करताना भारतीय संघातील स्थान निश्चित केले. या अगोदर झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कशीष भराड आणि श्रेयस जाधव यांनी चमकदार कामगिरी करत विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. यामुळे या स्पर्धेत देखील ते चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा त्यांचे प्रशिक्षक, पालक आणि त्यांच्या चाहत्यांना आहे. हेही वाचा - Akola : आरोग्य केंद्रालाच ‘उपचाराची’ गरज; रुग्णांच्या त्रासात भर, पाहा VIDEO भारताचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो "भारतीय संघात स्थान मिळवताना खूप मेहनत घ्यावी लागली आता भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना औरंगाबाद ची मुलगी म्हणून अभिमान वाटतो. स्पर्धा जिंकण्यासाठी माझी तयारी पूर्ण झाली आहे", अशी प्रतिकिया कशीष भराडने Local18 शी बोलताना दिली आहे. कशीषची आई अंजली भराड म्हणाल्या की, "भारतीय संघात कशीषची निवड झाल्यामुळे आमच्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना जबाबदारीने खेळून जिंकेल असं मला वाटतं". हेही वाचा - Nashik: आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र बारकावे माहित असल्याने याचा फायदा भारतीय संघाला होईल "श्रेयस हा लहानपणापासून तलवारबाजी स्पर्धा खेळतो. यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील जिंकल्या आहेत. यामुळे लंडन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. या स्पर्धेत त्याला बारकावे माहित असल्याने याचा फायदा भारतीय संघाला होईल", अशी प्रतिक्रिया श्रेयसचे वडिल अविनाश जाधव यांनी  Local18 शी बोलताना दिली. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा  दरम्यान, भारतीय संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचं राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष सतेज पाटील, सरचिटणीस उदय डोंगरे, साई स्पोर्ट्सचे सहसंचालक नितीन जैस्वाल, एस. पी.जवळकर, दिनेश वंजारे, गोकुळ तांदळे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News, Sports

    पुढील बातम्या