मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंबादास दानवेंनी चोळले संजय शिरसाटांच्या जखमेवर मिठ, म्हणाले 'ते मोठे नेते...'

अंबादास दानवेंनी चोळले संजय शिरसाटांच्या जखमेवर मिठ, म्हणाले 'ते मोठे नेते...'

 अनेक प्रोजेक्ट्स पळवले गेले. याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही.

अनेक प्रोजेक्ट्स पळवले गेले. याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही.

अनेक प्रोजेक्ट्स पळवले गेले. याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 15 सप्टेंबर : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापासून औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट कमालीचे नाराज आहे. आता शिंदे गटाकडून उपनेतेपदही देण्यात आले नाही. मुळात, संजय सिरसाट मोठे नेते आहेत म्हणून त्यांना उप नेतेपद मिळाले नसावे, असं म्हणत शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी टोला लगावला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर चोहीबाजूने टीका होत आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. तळेगावामध्ये आपण ज्या सुविधा देणार होतो त्या गुजरातमध्ये नाहीत. गुजरातने प्रकल्प पळवला. अनेक प्रोजेक्ट्स पळवले गेले. याला सध्याचे सरकार जबाबदार आहे. हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या काही बादशाहीमुळे राज्य सरकार बोलू शकत नाही, अशी टीकाही दानवेंनी केली. (भाजपची नवी खेळी, शिंदे गटातील माजी खासदाराला देणार डच्चू? या मतदारसंघातील उमेदवाराविषयी मोठा खुलासा) नवीन प्रकल्प आणणे म्हणजे किराणा दुकानावर जाऊन खरेदी करण्यासारखे आहे का, लहान मूल रडत म्हणून खाऊ देणारी गोष्ट आहे का, असा सवालही दानवेंनी केला. शिंदे सरकारने उपनेतेपद बहाल केले आहे. पण यावेळी संजय शिरसाट यांना संधी मिळाली नाही. मुळात ते मोठे नेते आहे, त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिले नाही, असं म्हणत दानवे यांनी संजय शिरसाट यांच्या जखमेवर मिठ चोळले. येत्या 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. दरवर्षी सकाळी 9 वाजता स्मृतिस्थळावर अभिवादन केले जाते. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादन करणार आहेत. मात्र वेळ आणि स्थळ बदलण्यात आले आहे. सकाळी 7 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन केले जाणार आहे. यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. 'हा मराठवाड्याचा अपमान आहे दिल्लीचे बादशाह येणार म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन औरंगाबादमध्ये घाई गडबडीत उरकला जाणार आहे. हैद्राबादच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री जाणार आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 75 वर्षे होत आहे मात्र काहीच विशेष नाही, अशी टीकाही दानवेंनी केली. (मग 2 वर्षे फक्त खोक्यांची ओझी वाहत होता? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल) राज्यातील कायदाव्यवस्था ढासळली आहे. सरकारचा धाक राहिलेला नाही. मुंबईमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर गोळीबार करतात, तरी अटक होत नाही. उदय सावंत यांच्या हल्ला झाला नाही तरी त्यांना अटक होते. सत्ताधारी नेते सतत दादागिरी करून कायदा हातात घेत आहेत. पोलीस डोळे झाकून बसलेत का? अशी दादागिरी सरकार करीत आहे, अशी टीकाही दानवेंनी केली. लम्पीविषयी लस किती आहेत हे सरकारला माहीत नाही. अनेक मंत्री आपल्या जागेवर नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असतांना पालघरमध्ये हल्ला करणाऱ्यांना अटक केली. सांगली मध्ये हल्ला झाला. साधूंवर हल्ला म्हणजे हिंदू वर हल्ला आहे, असंही दानवे म्हणाले.
First published:

पुढील बातम्या