मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : 10 रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवेचा बँकांना फटका, पाहा Ground Report

Video : 10 रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवेचा बँकांना फटका, पाहा Ground Report

X
10

10 रुपयांची नाणी औरंगाबाद मध्ये बंद झाल्याची अफवा पसरली आहे.

10 रुपयांची नाणी औरंगाबाद मध्ये बंद झाल्याची अफवा पसरली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 28 नोव्हेंबर : नागरिकांच्या व्यवहारातील गरज लक्षात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने बँकांना नाण्यांचा पुरवठा करत नागरिकांची गैरसोय टाळली. मात्र, हे 10 रुपयांची नाणी औरंगाबाद मध्ये बंद झाल्याची अफवा पसरली आहे. यामुळे शहरातील किरकोळ विक्रेते आणि दुकान चालक 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत. परिणामी बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये तब्बल 9 कोटी रुपये मूल्यांची नाणी साठली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या या रक्कमेमुळे बँकांमध्ये चिल्लर ठेवण्यासाठी जागा नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान ही अफवा खरी आहे का खोटी याचाच आढावा News18 लोकमतच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

दैनंदिन व्यवहारामध्ये आणि किरकोळ खरेदी करत असताना नागरिकांना सुट्ट्या पैशांची आवश्यकता भासते. सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यास नागरिकांना व्यवहार करता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून भारतीय रिझर्व बँकेने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकांच्या माध्यमातून बाजारामध्ये 10 रुपयांची नाणी आणली. 10 रुपयांच्या नाण्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळली जाईल अशी परिस्थिती असताना मात्र बाजारामध्ये 10 रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा पसरली आहे. यामुळे शहरातील किरकोळ विक्रेते, रिक्षा चालक, हॉटेल चालक, दुकान चालक हे 10 रुपयाचं नाणं स्वीकारण्यास नकार देत आहे. अनेकांकडे 10 रुपयांच्या नाण्याची रोकड जमा झाली असल्यामुळे ते घेण्यसाठी कोणी तयार नसल्याचं दुकान चालक सांगतात.

महानगरपालिकेला वाहतुकीचा सल्ला द्या आणि जिंका तब्बल 20 लाख रुपये!

पहिली घटना

औरंगाबाद शहरातील विद्यापीठ गेट पासून ते औरंगपुऱ्यापर्यंत News18 लोकमतच्या प्रतिनिधीने रिक्षाने प्रवास केल्यानंतर रिक्षा चालकाला 10 रुपयाचं नाणं देण्यात आलं. यावेळी तो रिक्षा चालक म्हणाला की, हे 10 रुपयाचं नाणं सध्या बाजारामध्ये बंद झाले आहे. यामुळे मी ते घेऊ शकत  नाही. मला 10 रुपयाची नोट द्या. त्याला प्रतिप्रश्न केला असता हे नाणं बंद नाही झाले तर तो म्हणाला की सध्या बाजारामध्ये ते कोणीही घेत नाही आहे. यामुळे मी ते घेऊ शकत नाही.

Video: मुंबईनंतर औरंगाबादमध्ये गोवरचा शिरकाव, मुलांचं प्रमाण मोठं असल्यानं पालकांना टेन्शन!

दुसरी घटना

औरंगाबाद शहरातील चहा विक्रेत्याला चहा खरेदी केल्यानंतर 10 रुपयाचं नाणं दिले असता तो म्हणाला की, माझ्याकडे अगोदरच 10 रुपयांची 400-500 नाणी जमा झाली आहेत ते ग्राहकांना परत दिले तर ते घेत नाहीत. यामुळे मी सध्या हे 10 रुपयाचं नाणं घेऊ शकत नाही.

10 रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा

बाजारामध्ये ग्राहकांची गरज लक्षात घेऊन रिझर्व बँकेने 10 रुपयांची नाणी बाजारात आणली. यासोबत 1, 2 व 5 रुपयांची नाणी देखील आहेत. बाजारामध्ये 10 रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा आहे. असे काहीही आदेश रिझर्व बँकेने दिलेली नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये 10 रुपयांची नाणी तुम्ही व्यवहारात वापरू शकता,असं बँक ऑफ महाराष्ट्राचे बँक मॅनेजर मंगेश केदारे यांनी सांगितले.

First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News, Local18