बीड, 14 डिसेंबर: रविवारी पहाटेबीड शहरातील एका ऑटोमोबाईल्सच्या दुकानावर दरोडा (Robbery at automobile shop) टाकल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी मध्यरात्री दुकान फोडून 6 लाखांचा ऐवज लंपास (Theft 6 lakh) केला होता. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या गुन्ह्याच्या छडा लावला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) अधारे तपास करत तीन आरोपींना अटक (3 arrested) केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील रहिवासी असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपीनं चोरी करण्यासाठी कंपनीत रजा घेतली (Take leave to commits theft) होती. रजा घेतल्यानंतर आरोपी औरंगाबादहून बीडमध्ये पोहोचला होता. याठिकाणी आरोपीनं आपल्या काही मित्रांच्या मदतीने ऑटोमोबाइल्सच्या दुकानावर डल्ला मारला होता. भामट्यांनी दुकानाची ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट लंपास केले होते.
हेही वाचा-महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना
पण त्यांची ही चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यामुळे अवघ्या चोवीस तासात तीन आरोपी गजाआड झाले आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. सोमनाथ रतन लोहकरे (32, एमआयडीसी वाळूज), कबीर बुरन पठाण(32, श्रीपाद धामणगाव, जालना ), गणेश भारत गिरी (31, विश्वेश्वरनगर, बीड ) असं अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा-अपहरण आणि गँगरेपची तक्रार निघाली खोटी; नागपुरातील महाविद्यालयीन तरुणीचा बनाव उघड
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, बीड शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी असणारे महादेव बापूराव मोरे यांचं शहरातील जालना रोडवर ऑटोमोबाइल्सचं दुकान आहे. संबंधित भामट्यांनी रविवारी पहाटे मोरे यांच्या दुकानावर डल्ला मारला होता. चोरट्यांनी दुकानातून चारचाकी गाडीसह ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट असा एकूण 6 लाखांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारो शोध घेत, आरोपी लोहकरे आणि पठाण याला औरंगाबादेतून राहत्या घरातून अटक केलं. तर गिरी याला बीडमधून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Crime news, Robbery