मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'हम कोरोना टेस्ट कर रहे है' म्हणत रात्री 2 वाजता दरोडेखोर शिरले घरात; दागिन्यांसह लाखो रुपये लंपास

'हम कोरोना टेस्ट कर रहे है' म्हणत रात्री 2 वाजता दरोडेखोर शिरले घरात; दागिन्यांसह लाखो रुपये लंपास

बीडमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बीड, 2 डिसेंबर :'चुप बैठो हम कोरोना टेस्ट कर रहे है ' ( testing the corona) म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण करत दरोडेखोरांनी घरातील सोन्या - चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची लूटल्याचा धक्कादायक प्रकार (Beed News) माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. 6 अज्ञात दरोडेखोरांनी वयोवृध्द दाम्पत्यास मारहाण देखील केली. या घटनेने माजलगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (robbers broke into the house at 2 am saying we are testing the corona Stolen lakhs of rupees along with jewelery)

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे व सावित्री लक्ष्मण शिंदे हे दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला सुना नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात. रात्री 11 च्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले व घराच्या मेन गेटला आतून कुलूप लावून आपल्या पत्नीला घेऊन वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. दरम्यान खालच्या हॉलमध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपले होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दाम्पत्याला झाला. दरम्यान 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला.

हे ही वाचा-औरंगाबादेत बनावट ई-मेलद्वारे स्टील कंपनीच्या संचालकाला लुबाडलं; 36 लाखांचा गंडा

शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है, असे दरडावून म्हणत त्यांनी घरातील सामानाची नासधूस करत कपाट धुंडाळले. यावेळी त्यांना कपाटातील ड्रॉवरमध्ये 60 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याची साखळी, 40 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याची अंगठी, 10 ग्रॅम वजनाची जु.वा. 20 हजार रु. किंमतीचे एक सोन्याची पिळ्याची अंगठी, 5 ग्रॅम वजनाची 40 रुपये किंमतीचे एक सोन्याचा गंठन, 10 ग्रॅम वजनाचा 22 हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे मनीमंगळसूत्र, 5.5 ग्रॅम वजनाचे काळ्या मनीमध्ये ओवलेले 52 हजार रु . किंमतीचे एक जोड, सोन्याचे वेल व झुंबर 13 ग्रॅम वजनाचे जु.वा. 3,000 / रु . किंमतीचे एक सोन्याचे लहान मुलाचे कानातील कुडक पाऊन ग्रॅम वजनाचे 2 हजार रु . किमतीचे लहान मुलांचे चांदीचे चैन व वाळे 10 ग्रॅम वजनाचे जु.वा 9 ) 8,000 / -रु . रोख रक्कम त्यामध्ये 500 रु. दराच्या 16 भारतीय चलनी नोटा एकुण 2 लाख 47 हजार रु किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रखमीची लूट केली. घराला बाहेरून बंद करून घरातून पोबारा केला. दरम्यान या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात दरोडेखोरांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 395, 357, 342 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Beed, Corona patient, Crime news