मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : रिक्षाचालकांच्या संपामुळे विद्यार्थी वेठीस, परीक्षेला जाताना झाले हाल, Video

Aurangabad : रिक्षाचालकांच्या संपामुळे विद्यार्थी वेठीस, परीक्षेला जाताना झाले हाल, Video

X
यामुळे

यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 1 डिसेंबर : औरंगाबाद शहराची जीवन वाहिनी असलेल्या रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आज परीक्षा असल्यामुळे त्यांना परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोहोचता न आल्यामुळे मोठा मनस्ताप त्यांना सहन करावा लागला.

औरंगाबाद शहर हे आशिया खंडात सर्वात वेगाने विकसित होणार औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. यामुळे या ठिकाणी येणारे व या ठिकाणचे नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून रिक्षाला प्राधान्य देतात. त्यामुळे औरंगाबाद शहरांमध्ये रिक्षाचे जाळे मोठे विस्तारलेले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादकर रिक्षाने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.

औरंगाबाद महानगरपालिकेने सार्वजनिक वाहतुकीसाठी स्मार्ट सिटीच्या बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्या पोहोचू शकत नसल्यामुळे आजही सर्वसामान्य नागरिक रिक्षाला प्राधान्य देत आहेत. मात्र, आज रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शहरात प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येते आहे.

Aurangabad : भटक्या कुत्र्यांची दहशत, भीतीमुळं घराबाहेर पडणं ही अवघड, पाहा Video

परीक्षेचा वेळ निघून गेला

मी रेल्वे स्टेशन परिसरातून एमजीएम महाविद्यालयामध्ये परीक्षेसाठी जात आहे. मात्र, अचानक रिक्षा चालकांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून मी रिक्षांची वाट बघत आहे. मात्र, अद्यापही मला रिक्षा मिळत नाही. यामुळे माझा परीक्षेचा वेळ निघून गेला असल्याचे विद्यार्थी स्नेहा हिने सांगितले.

हर्सूल परिसरात राहणारी सोनाली खाजगी शिकवणीसाठी उस्मानपुरा भागामध्ये येत असते. सकाळी ती रिक्षाने उस्मानपुरामध्ये आली. मात्र, परत जाताना रिक्षा चालकाचा संप असल्याची माहिती मिळाली. गेल्या एक तासापासून मी रिक्षाची वाट बघत थांबलेली आहे, असं सोनाली हिने सांगितले.

काय आहेत रिक्षा चालकांच्या मागण्या?

वाहतूक पोलिसांनी सध्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची मोहिम बंद करण्यात यावी. रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू नयेत. यात पीयुसी, फिटनेस, मीटर कॅलिब्रेशन अशा अनेक कारणांसाठी रिक्षा चालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे काही दिवसांची मुदत देत ही कारवाई स्थगित करावी, तसेच मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रिक्षा चालकांची आहे, अशी माहिती रिक्षा संघटना अध्यक्ष सलीम खामगावकर यांनी दिली आहे. 

First published:

Tags: Aurangabad, Local18