औरंगाबाद, 15 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) शहरातील कामाक्षी चौक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एका रिक्षाचालकाने अवघ्या दहा रुपयांसाठी एका प्रवाशाचा जीव (Rickshaw driver murdered passenger for 10 rupee) घेतला आहे. आगाऊ रिक्षाभाडं न दिल्याच्या कारणातून प्रवाशासोबत वाद झाल्यानंतर, रिक्षाचालकाने प्रवाशाच्या नाकावर हाताने आणि डोक्याने मारहाण (Beating) केली आहे. यामध्ये संबंधित प्रवाशी रक्तबंबाळ झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं असता, त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.
मिर्झा मुझफ्फर हुसैन मिर्झा अली हुसैन असं मृत पावलेल्या प्रवाशाचं नाव आहे. तर बाबा सुलेमान बावजीर असं अटक केलेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुझफ्फर यांना शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून कामाक्षी चौक परिसरात जायचं होतं. त्यासाठी ते बाबा सुलेमान बावजीर यांच्या रिक्षात बसले. कामाक्षी चौक येथे पोहोचल्यानंतर रिक्षाभाडं देताना मुझफ्फर यांचा रिक्षा चालक बाबा सुलेमान बावजीर याच्यासोबत 10 रुपायावरून वाद झाला.
हेही वाचा-डोळ्यात मिरची पूड टाकत लोखंडी रॉडने घातले घाव; अनैतिक संबंधातून BF चा खेळ खल्लास
मुझफ्फर यांनी रिक्षा चालक बाबा याला 20 रुपये दिले. परंतु रिक्षाचालकाने आणखी 10 रुपये द्यावे लागतील, म्हणत मुझफ्फर यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. दहा रुपयावरून सुरू झालेला हा वाद थेट हाणामारी करण्यापर्यंत पोहोचला. रिक्षा चालक बाबा याने हाताने आणि डोक्याने मुझफ्फर यांच्या नाकावर मारून त्यांना जखमी केलं. त्यांच्या नाकातून रक्त आल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. त्यांच्या डोक्यालाही मार लागला होता.
हेही वाचा-सेक्ससाठी नकार दिल्याने गाठला क्रूरतेचा कळस, पत्नीला जिवंतपणीच दिल्या नरक यातना
या घटनेत जखमी झालेल्या मुझफ्फर यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी मुझफ्फर यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात रिक्षाचालक बाबा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news, Murder