औरंगाबाद, 10 डिसेंबर : 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती' असं वक्तव्य केल्यामुळे भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चोहीबाजूने टीका झाली. अखेर, कुणाच्या भावना दुखावल्या असतील दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असं म्हणत पाटील यांनी आपल्याच विधानावरून यू-टर्न घेतला.
राज्यात वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे. आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. विरोधकांनी आणि सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त केला. पण, आज चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खुलासा केला आहे.
कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे - चंद्रकांत पाटील pic.twitter.com/nwm80xOHLc
— News18Lokmat (@News18lokmat) December 10, 2022
'आता जर यांचं म्हणणं असेल तर वर्गणी म्हणायला पाहिजे होतं, तर त्या काळात हे शब्द नव्हते, त्यावेळी भीक मागून मी संस्था उभी केली असं प्रचलित वाक्य होतं. माझं पहिलं वाक्य काय आहे, सगळ्यांबद्दल आदर करणारं वक्तव्य आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरू केल्या असं मी म्हटलं आहे. ते सगळे सरकारवर अवलंबून राहिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा उभ्या केल्या. भीक म्हणजे काय, आज आपण नवरात्र, गणपतीला, आंबेडकर जयंतीला जे जाऊन फिरतो, तेच म्हणतो ना, आम्हाला जयंती साजरी करायची आहे, आम्हाला वर्गणी द्या. मी काय केलं, खांद्यावरच गमच्छा काढला आणि अॅक्शन करून वक्तव्य केलं. जर माझ्या विधानामुळे कुणाच्या दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. मी इतका छोटा माणूस नाही. माझ्या मनात श्रद्धा आहे, माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले आहे. मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
(धनंजय मुंडेंनी डोक्याला लावला हात, पैसे मागण्याच्या फोनमुळे पोलिसांकडे घेतली धाव)
'डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्याबद्दल मला आदर आहे. नुसता आदर नसून श्रद्धा आहे. त्यामुळे मला कुणी शिकवण्याची गरज नाही. तो आदर माझ्यामध्ये आहे. बाबासाहेबांनी चळवळ केली नसती, शिका आणि शहाणे व्हा, असा नारा दिला नसता तर फार मोठ्या प्रमाणात हा समाज अशिक्षित राहिला असता, असंही पाटील म्हणाले.
(कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उघडपणे दिला इशारा, शिंदे गटाचे मंत्री म्हणाले...)
संजय राऊत फुकाच्या गप्पा करत आहे, आमच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून पण तुम्हाला राजकारण करायला काही तरी विषय शोधून काढायचे आहे. एवढं वारकऱ्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं. मी संत साहित्यासाठी 23 कोटी घोषित केले आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.