मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /RBI ची औरंगाबादमधील बँकेवर मोठी कारवाई, अनेकांचे पैसे अडकले

RBI ची औरंगाबादमधील बँकेवर मोठी कारवाई, अनेकांचे पैसे अडकले

 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हटले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हटले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हटले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 25 फेब्रुवारी : आरबीआयने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सहकारी बँकावर धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील 2 बँकांसह 5 को ऑपरेटिव्ह बँकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निवेदनात म्हटले आहे की या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने सुरू राहतील. या निर्बंधांमुळे या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकत नाहीत.CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार या बँकांना आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. संपत्ती ट्रान्सफर किंवा त्या संदर्भातील कामं करु शकणार नाहीत.

(ग्राहकांना मोठा धक्का! RBI ने 5 सहकारी बँकांवर लावले निर्बंध, काढता येणार नाहीत पैसे)

या पाच बँकांमध्ये HCBL सहकारी बँक, लखनऊ, आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद आणि कर्नाटकातील शिमशा सहकारी बँक नियामिथा, मद्दूर, मंड्या जिल्ह्यातील ग्राहक सध्याच्या तरलतेच्या संकटामुळे त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत. त्याचबरोबर उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) चे ग्राहक 5,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात.

(सॅलरी बँक अकाउंटसाठी SBI आहे बेस्ट! फ्रीममध्ये मिळतील अनेक सेवा)

या निर्बंधांमुळे या बँका आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देऊ शकत नाहीत. या पाच सहकारी बँकांवरील निर्बंध पुढील सहा महिने कायम राहणार आहेत.

कर्जदारांची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पाच सहकारी बँकांवर रोख रक्कम काढण्यासह अनेक निर्बंध लावले आहेत.

First published:
top videos

    Tags: Business News