मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मायचं दूध प्यायला असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा', रावसाहेब दानवे यांचं खुलं आव्हान

'मायचं दूध प्यायला असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा', रावसाहेब दानवे यांचं खुलं आव्हान

आज रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना (Jalna News) नगर परिषदे अंतर्गत मंजूर झालेल्या वार्ड क्रमांक 1 आणि 7 मधील सिमेंट रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जालना, 5 डिसेंबर : मायचं दूध प्यायलं असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, असं खुलं आव्हान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नाव न घेता अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना दिलं आहे. आज रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना (Jalna News) नगर परिषदे अंतर्गत मंजूर झालेल्या वार्ड क्रमांक 1 आणि 7 मधील सिमेंट रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापेमारी केली होती. त्यांनतर खोतकर यांनी दानवे यांच्या सांगण्यावरूनच ही छापेमारी झाली असून त्यांनीच रस्त्याच्या कामात घोटाळे केल्याचा आरोप करत ते उघड करण्याचा इशारा दिला होता. त्यावरून आज दानवे यांनी खोतकर यांचा समाचार घेतला.

आजच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल, नगराध्यक्षा संगीता गोरंटयाल यांचीही उपस्थिती होती. एका 400 लोकसंख्या असलेल्या गावातून येऊन आपण केंद्रीय मंत्रीपदापर्यंत खूप मोठी झेप घेतली असून लोक माझ्यावर जसे आरोप करतात तसा मी माझ्या राजकीय आयुष्यात आणखी मोठा होत चाललोय असं ते म्हणाले. मी चिडचिड करणार नाही, कुणावरही आरोप करणार नाही असा टोलाही त्यांनी खोतकरांना लगावलाय.

हे ही वाचा -काल कोरोनाची नियमावली जाहीर अन् आज आरोग्यमंत्र्यांनाच पडला मास्कचा विसर!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचं काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची यादी असून गडकरी यांनी या यादीतील नावं जाहीर करावीत. या यादीतील नावं गडकरी यांनी जाहीर केल्यास आणखी एखादी टीम घरी येईल असा टोला काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता लगावला. जालनेकरांची उंची ही कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्याला बंदूक लाऊन वसुली करण्याची आहे असा आरोप गोरंटयाल यांनी नाव न घेता खोतकरांवर केलाय.

First published:

Tags: Raosaheb Danve