मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंना युतीमध्ये घेतलं तर... रामदास आठवलेंनी दिला धोक्याचा इशारा

राज ठाकरेंना युतीमध्ये घेतलं तर... रामदास आठवलेंनी दिला धोक्याचा इशारा

Ramdas Athawale on MNS BJP Alliance

Ramdas Athawale on MNS BJP Alliance

आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेला भाजप, शिंदे आणि आरपीआयच्या युतीमध्ये घ्यायला विरोध केला आहे.

  • Published by:  Shreyas
औरंगाबाद, 16 सप्टेंबर : आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेला भाजप, शिंदे आणि आरपीआयच्या युतीमध्ये घ्यायला विरोध केला आहे. राज ठाकरेंचा युतीला कोणताही फायदा नसल्यामुळे त्यांना युतीमध्ये घेऊ नये, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे. राज ठाकरे यांनी निळा आणि हिरवा रंग वगळून एकच रंग हाती घेतला आहे, याचा युतीला काहीच फायदा होणार नाही, त्यामुळे येणाऱ्या मुंबई आणि राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास आठवलेंकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आठवले गटाला 15 जागा मिळाव्यात आणि उपमहापौरपद मिळावं, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे, त्यामुळे धन्युष्यबाण हे चिन्ह शिंदेंना मिळेल, उद्धव ठाकरेंना वेगळं चिन्ह द्यावं, असंही आठवले म्हणाले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हद्दपार करणार असल्याची टीकाही आठवलेंनी केली. 60 वर्षात काँग्रेसला भारत जोडता आला नाही, आता राहुल गांधी काय भारत जोडणार? असा टोलाही आठवले यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर हाणला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक आहोत. शिर्डीमध्ये माझ्याविरुद्ध अपप्रचार करण्यात आला, त्यामुळे माझा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्रातून जायला महाविकासआघाडी सरकार जबाबदार आहे. महाविकासआघाडी सरकारने याबाबत माहिती देणं गरजेचं होतं, पण त्यांना अपयश आल्यामुळे हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्याची टीका आठवले यांनी केली आहे.
First published:

Tags: BJP, MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या